---Advertisement---

‘कॅप्टन’ कोहलीने शार्दुल ठाकूरचे केले चक्क मराठीत कौतुक; चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

On: सोमवार, डिसेंबर 23, 2019 4:40 PM
---Advertisement---

कटक। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(22 डिसेंबर) तिसरा आणि निर्णायक वनडे सामना बाराबती स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ही वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात 316 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने 7 व्या विकेटसाठी 15 चेंडूत नाबाद 30 धावांची भागीदारी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

ही भागिदारी करताना शार्दुलने 6 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 17 धावा केल्या. त्याच्या या छोटेखानी पण तुफानी खेळीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. विशेष म्हणजे विराटने मराठीत ट्विट करत मुंबईकर शार्दुलचे कौतुक केले.

विराटने शार्दुलबरोबर एक फोटो पोस्ट करताना ट्विट केले की ‘तूला मानला रे ठाकूर’

विराटच्या या ट्विटला चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून त्यांनी या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/APW_Akshay/status/1208957824077840384

https://twitter.com/Amya_007/status/1208969743107010561

https://twitter.com/Sonusingc451/status/1208941571392954368

शार्दुलने फलंदाजी बरोबरच गोलंदाजी करताना 10 षटकांत 66 धावा देत 1 विकेट घेतली.

या सामन्यात वेस्ट इंडिजने निकोलस पूरन(89) आणि कायरन पोलार्ड(74*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 5 बाद 315 धावा करत भारतासमोर विजयासाठी 316 धावांचे आव्हान ठेवले होते.

हे आव्हान भारताने 48.4 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून रोहित शर्मा(63), केएल राहुल(77) आणि विराट कोहली(84) यांनी अर्धशतके केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---