भारत आणि इंग्लंड महिला संघातील दुसरा टी-20 सामना शनिवारी (9 डिसेंबर) खेळला गेला. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 80 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने अवघ्या 11.2 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 82 धावा केल्या आणि 4 विकेट्स राखून विजय मिळवला. चार्ली डीन सामनावीर ठरली, जिने सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या विकेट्स घेतल्या.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमर शनिवारी (9 डिसेंबर) हा लो स्कोरिंग सामना खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतासाठी जेमिमाह रॉड्रिग्ज () हिने सर्वोत्तम 30 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त भारतासाठी एकही खेळाडू 10 पेक्षा अधिकधावांचे योगदान देऊ शकला नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य 6 विकेट्सच्या नुकसानावर गाढले. ऍलिस कॅप्सी हिने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. नेट सायव्हर ब्रंट हिनेही 16 धावांचे योगदान दिले.
भारतीय संघासाठी या सामन्यात सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने अनुक्रमे शुन्य आणि 10 धावांवर विकेट्स गमावल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज हिने 30, कर्णधार हरमनप्रीत कौर 9, दीप्ती शर्मा शुन्य, रिचा घोष 4, पूजा वस्त्राकर 6, श्रेयांका पाटील 4, तीतास साधू 2, तर शिखा ईशाख हिने 8 धावांचे योगदान दिले. रेनुका सिंग हिनेही 2* धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडसाठी सलामी फलंदाज सोफीया डंकले हिने 9, तर डॅनियल वॅटने शुन्यावर विकेट गमावली. ऍलिस कॅप्सी याने 25, नेट सायव्हर ब्रंट 16, एमी जोन्स हिने 5, तर फ्रेया कॅम्प हिने गोल्डन डकवर विकेट गमावली. कर्णधार हेदर नाइट 7*, तर सोफी एक्लेस्टोन 9* धावांसह शेवटपर्यंत खेळपट्टीवर काय होती.
गोलंदाजी विभागत भारतासाठी रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. त्याआधी इंग्लिश गोलंदाजांचे प्रदर्शन नक्कीच कौतुकास्पद ठरले. चार्ली डीन, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या. नेट सायव्हर ब्रंट आणि फ्रेया कॅम्प यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. (In the second T20 match, England women’s team beat India women’s team by 4 wickets)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, सायका इशाक.
इंग्लंड – सोफिया डंकले, डॅनी व्याट, ऍलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (डब्ल्यूके), फ्रेया कॅम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, चार्ली डीन, लॉरेन बेल.
महत्वाच्या बातम्या –
खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत उस्मानाबाद अ(धाराशिव) संघाला विजेतेपद
भारतीय संघावर मान खाली घालण्याची वेळ! इंग्लंडकडून 80 धावात सुपडा साफ