-अनिल भोईर
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड व अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कुल, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन बीड येथे करण्यात आले आहे. यास्पर्धेचे काल मा. मंत्री पंकजा मुंढे याच्या हस्ते उद्घाटन झाले.
स्पर्धेत एकूण ८ विभागातून १६ संघांनी सहभाग घेतला आहे. सर्व सामने हे बाद पध्दतीने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी मुलांचे ४ व मुलींचे ४ असे एकूण ८ सामने खेळवण्यात आले. मुलाच्या विभागात मुंबई विरुद्ध लातूर विभाग यांच्यातील सामना चुरशीचा झाला. हा सामना मुंबई विभागाने शेवटच्या मिनिटाला ३४-३३ असा जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या झालेल्या उद्घाटन सामन्यात औरंगाबाद विभागाने नाशिक विभागाला ४८-२८ असे सहज नमवले. पुणेच्या महिला संघाने एकतर्फी ४३-२० असा अमरावतीवर विजय मिळवला. कोल्हापूरच्या महिला विभागाने लातूरला ५१-२५ असे हरवले.
मुंबई विभागाच्या मुलींनी ४३-१९ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. तर मुलाच्या विभागात पुणे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. नागपूरने ४२-३३ असा विजय मिळवला.
पहिल्या दिवसाचे निकाल:
मुले विभाग:
१) मुंबई ३४ विरुद्ध लातुर ३३
२) कोल्हापूर ५५ विरुद्ध अमरावती २०
३) नागपुर ४२ विरुद्ध पुणे ३३
४) नाशिक १२ विरुद्ध औरंगाबाद ५३
मुली विभाग:
१) औरंगाबाद ४८ विरुद्ध नाशिक २८
२) अमरावती २० विरुद्ध पुणे ४३
३) नागपूर १९ विरुद्ध मुंबई ४३
४) कोल्हापूर ५१ विरुद्ध लातुर २५
आज होणारे सामने:
उपांत्य फेरी सामने मुले-
१) मुंबई विरुद्ध कोल्हापूर
२) नागपूर विरुद्ध औरंगाबाद
उपांत्य फेरी सामने मुली-
१) कोल्हापूर विरुद्ध पुणे
२) मुंबई विरुद्ध औरंगाबाद
महत्त्वाच्या बातम्या-
–हुंदळेवाडीचा वाघ… सिद्धार्थ देसाई
–कॅप्टन कूल अनुप कुमार करणार प्रो कबड्डीला अलविदा?