बुधवारी (१५ जून) रात्री बीसीसीआयने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. हार्दिक पंड्याला या मालिकेत भारताचा कर्णधार बनवले गेले आहे. भारताचा वरिष्ट संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी युवा खेळाडूंना निवडले आहे. संघात एक नाही, तर तीन यष्टीरक्षक फलंदाजा सहभागी आहेत. आता या तिघांपैकी कोणता खेळाडू प्रत्यक्षात यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडतो? हे पाहावे लागणार आहे.
भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर इंग्लंडमध्ये वरिष्ठ संघासोबत जोडला जाईल. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत आयर्लंड दौऱ्यात इशान किशन (Ishan Kishan), संजू सॅमसन (Sanju Samson) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हे तीन यष्टीरक्षकांचे पर्याय संघात आहेत. या तीघांपैकी प्रत्यक्षात यष्टीपाठी कोणता खेळाडू उभा राहतो? हे पाहण्यासारखे असेल. आपण या लेखात पाहणार आहोत की, या तिघांपैकी कोणत्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल आणि कोण यष्टीरक्षकाची भूमिका पाडू शकतो?
इशान किशन –
इशान किशन सध्या सुरू असेलल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात ७६, दुसऱ्या सामन्यात ३४, तर तिसऱ्या सामन्यात ५४ धावांची खेळी त्याने केली आहे. इशानने या तिन्ही सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरुवात दिली आहे आणि आयर्लंड दौऱ्यासाठी देखील तो डावाची सुरुवात करताना दिसेल. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन ही सलामीवीर आयर्लंड दौऱ्यात देखील दिसू शकते. असे असेल तरी, यष्टीरक्षकाची जबाबदारी त्याच्याकडे असेलच याची मात्र खात्री नाहीये.
दिनेश कार्तिक –
भारतीय संघाचा दिग्गज दिनेश कार्तिकने मोठ्या काळानंतर आयपीएल २०२२ मधून जोरदार पुनरागमन केले. या हंगामात कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने संपूर्ण हंगामात स्वतःच्या धमाकेदार फलंदाजीने चाहत्यांचे आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. याच प्रदर्शाच्या जोरावर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडले गेले आणि प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. अशात आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत कार्तिक प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, यात सध्या तरी कोणती शंका वाटत नाही. एवढेच नाही, त्याचा यष्टीरक्षकाच्या रूपातील अनुभव आणि सध्याचा चांगला फॉर्म पाहता, याष्टीरक्षणाची जाबबादारी देखील त्याच्याकडे सोपवली जाऊ शकते.
संजू सॅमसन –
आयपीएल २०२२ मध्ये संजू सॅमसनकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, पण तो या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. कर्णधाराच्या रूपात त्याने चांगली कामगिरी केली, पण वैयक्तिक प्रदर्शन मात्र समाधानकारक नव्हते. तब्बल १४ वर्षांचा काळ गेल्यानंतर सॅमसनने राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचवले, पण त्याठिकाणीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सॅमसनचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी निवडले जरी असेल, तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये तो स्थान मिळवू शकेलच, याची खात्री देता येणार नाही.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘कधी दिवस चांगले…’, भारतासाठी पहिले अर्धशतक ठोकल्यानंतर ऋतुराजने सांगितले खेळीमागील रहस्य