भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (10 डिसेंबर) इंग्लंडविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पारभव स्वीकारल्यानंतर तिसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील भारताने गमावली. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी तिसऱ्या टी-20 सामन्यात कशी असणार, हे पाहण्यासारखे आहे.
पाहुण्या इंग्लंड संघाने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला मात दिली आहे. सलग दोन विजयांनंतर तीन सामन्यांच्या या टी-20 मालिकेत इंग्लंडने 0-2 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न इंग्लंड संघाचा रविवारी असेल. या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इंग्लंडने चार बदल केले. सारा ग्लेन, नेट सायव्हर ब्रंट, डॅनियल वॅट आणि लॉरेन बेल यांना विश्रांती दिली गेली आहे. माईया बावचियर, डॅनी गिब्सन, बेस हीथ आणि माहिका गौर यांना संघात घेतले गेले आहे. भारतीय संघातही एक बदल पाहायला मिळाला. पूजा वस्त्राकर हिला विश्रांती दिली गेली असून अमनजोत कौर ही प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. (In the third T20 match, England won the toss and decided to bat first)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, तीतस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक.
इंग्लंड – सोफिया डंकले, माइया बाउचियर, ऍलिस कॅप्सी, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA: चहलची वनडे संघात निवड झाल्यामुळे माजी दिग्गजही हैराण; म्हणाला, ‘तो तर…’
INDvsENG । वानखेडे स्टेडियमबाहेर गोंधळ! मोफत प्रवेशामुळे चाहत्यांनी काय केलं पाहाच