जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत बुधवारी (7 जून) लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू झाली. सामन्याची सुरुवात भारतीय संघाच्या मनाप्रमाणे झाली, असे म्हणता येईल. कारण नाणेफेक जिंकून संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाची सुरुवातही मिळवली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रोहित आपल्या खास शैलीमध्ये डीआरएस घेताना दिसतो.
मागच्या बऱ्याच दिवसांपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीचा हा अंतिम सामना चर्चेत होता. बुधवारी अखेर हा सामना सुरू झाला. उभय संघांतील ही लढत भारताच्या मनाप्रामाणे सुरू झाली. कारण रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोहम्मद सिराजने डावातील चौथ्या षटकात उस्मान ख्वाजा याच्या रूपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघी 2 धावा होती आणि ख्वाजाने 10 चेंडू खेळून एकही धाव न करता विकेट गमालली. यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात त्याने झेल दिल्याने सलामीवीर फलंदाजाला मैदान सोडावे लागले.
त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लाबुशेन यांनी संयमी खेळ दाखवला. भारतीय संघ दुसऱ्या विकेटच्या शोधात असतानाच 18व्या षटकात हा प्रकार घडला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर लाबुशेनने चौकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) लाबुशेनची विकेट घेता घेता राहिला. गोलंदाज आणि खेळाडूंना शंका असल्यामुळे रोहितने डीआरएस घेतला. रोहितने घेतलेला डीआरएस संघाच्या कामी आला नाही. पण त्याचा व्हिडिओ मात्र जोरदार व्हायरल होत आहे. आयसीसीने रोहितची डीआरएस शैली घेण्याची पाहून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत रोहित पंचांकडे पाठ करून उभा आहे आणि मागे न पाहता डीआरएस घेत आहे. चाहत्यांच्या एकापेक्षा एक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CtMGLOatCKy/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
भारताला आपली दुसरी विकेट मिळवण्यासाठी 22व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. शार्दुल ठाकुरने टाकलेल्या या षटकात डेविड वॉर्नर 43 धावा करून विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका बसला तो मोहम्मद शमीने टाकलेल्या 25व्या षटकात. खेळपट्टीवर पाय जमवलेला मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) शमीच्या घातक चेंडूवर त्रिफळाचीत झाला. लाबुशेनने ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात 26 धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन, व्हीव्हीएस आणि द्रविडच्या यादीत जागा बनवणार विराट कोहली! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये करणार रेकॉर्ड
अर्रर्र! तोंडघशी पडता पडता वाचला रोहित शर्मा; नेटकरीही म्हणाले, ‘…आणि हा भारतीय संघ सांभाळतोय…’