क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज 100 सामने पूर्ण झाले. मागील 25 दिवसापासून सुरू असलेली स्पर्धा आता पुढील आठवड्यात अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज झालेल्या सामन्यात कोल्हापूर ताडोबा टायगर्स, नांदेड चांबल चॅलेंजर्स, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स व अहमदनगर पेरियार पँथर्स या संघांनी प्रतिस्पर्धी संघाला नमवत विजय मिळवला.
आज झालेला पहिला सामना कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध मुंबई शहर मौर्य मेवरीक्स अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या मिनिटा पर्यत रंगतदार झालेला हा सामना कोल्हापूर संघाने 43-41 असा जिंकला. कोल्हापूर च्या तेजस पाटील ने जोरदार पुरागमन करत आज सामन्यात 18 गुण मिळवत संघाच्या विजयात महत्वपुर्ण भूमिका निभावली. तेजस ला दोन्ही ओमकार पाटील यांनी प्रत्येकी 8-8 गुण मिळवत चांगली साथ दिली. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील व जतिन विंदे ची सुपर टेन खेळी व्यर्थ गेली.
नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज सामना सुरुवातीला अंत्यत अटीतटीचा झाला शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना 25-25 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर मात्र नांदेडच्या बचावफळीने व अजित चव्हाण ने आक्रमक खेळ करत गुण मिळवले व त्याने संघाला ऑल आऊट करत पिछाडीवर टाकले. नांदेड संघाने 38-29 असा विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली.
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाने सामन्याला कलाटणी देत पुणे संघाच्या तोंडांशी आलेला विजया घास खेचुन आणला. 35-32 असा विजय मिळवत मुंबई उपनगर संघाने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. आकाश रुडेले युवा कबड्डी सिरीज मध्ये 100 गुणांचा टप्पा पार केला. स्पर्धेतील 100 वा सामना अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झाला. अहमदनगर संघाने 41-29 असा विजय मिळवत स्पर्धेतील दहावा विजय मिळवला. या विजयासह अहमदनगर संघाने पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी दावेदारी मजबूत केली. (In the Yuva Kabaddi series, the fourth day of the promotion round saw tough matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी
चार वर्षानंतर हैदराबादमध्ये खेळणार वॉर्नर! आकडेवारी पाहून सनरायझर्सलाच फुटेल घाम