टोकियो ऑलिंपिक २०२० चा आज (२५ जुलै) तिसरा दिवस आहे. यात टेनिस महिला मिश्र गटात भारताने निराशाजनक कामगिरी केली. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाला महिला मिश्र गटात पराभव पत्करावा लागला. यासोबतच भारताच्या महिला मिश्र गटात पदक जिंकण्याच्या आशांना पूर्णविराम लागला आहे. सानिया आणि अंकिताचा जोडी पहिल्याच राऊंडमध्ये पराभूत होऊन बाहेर पडल्या आहेत. सानिया आणि अंकिताच्या जोडीने पहिला सेट ६-० ने जिंकला होता. मात्र, युक्रेनच्या नाडिया विक्टरिवना किचेनोक आणि ल्युडमीला विक्टरिवना किचेनोकच्या जोडीने शानदार पुनरागमन करत पुढील दोन्हीही सेट जिंकले आणि भारतीय जोडीचा प्रवास संपुष्टात आणला.
यादरम्यान १ तास ३३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात युक्रेनच्या नाडिया आणि ल्युडमीला यांनी भारतीय जोडीला ६-०, ७-६ आणि १०-८ असा पराभूत केले. (In Tokyo Olympics Sania, Ankita suffer shock defeat in first round of women’s doubles)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Tennis
Women's Doubles First Round ResultsKichenok twins stage a fight back to ace past @MirzaSania and @ankita_champ. A 💔 loss, but we'll come back stronger. Spirited efforts by the Indian Doubles pair! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/pIaIcvj4eW
— Team India (@WeAreTeamIndia) July 25, 2021
आजच्या या सामन्यात सानिया ऑलिंपिकमध्ये चौथ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करत होती. दुसरीकडे अंकिताने ऑलिंपिकमध्ये आपले पदार्पण केले आहे.
तत्पूर्वी शनिवारी झालेल्या पुरुष एकेरी गटातील दुसऱ्या राऊंडमध्ये सुमित नागलने चांगली कामगिरी केली. त्याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनला ६-४, ६-७ आणि ६-४ असा पराभव केला. आता त्याचा सामना जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा रशियाचा टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ