आयकर, पुणे आणि पीसीएमसी संघांनी सहज विजयासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धेत आपल्या मोहिमेस सुरुवात केली. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत आयकर संघाने पहिल्या सामन्यात हॉकी लव्हर्स अकादमीचा 5-0 असा पराभव केला. पूर्वार्धातील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर नितिन नंदनदोरीने 18व्या मिनिटाला गोल करून आयकर संघाचे खाते उघडले. त्यानंतर दोनच मिनिटांनी 20व्या मिनिटाला आशुतोष लिंगेशने संघाची आघाडी वाढवली. सामन्याच्या मध्यंतरापूर्वीच 28व्या मिनिटाला अथर्व कांबळेने तिसरा गोल करून आयकर संघाचा विजय जवळ जवळ निश्चित केले.
उत्तरार्धात 37 व्या मिनिटाला अथर्वने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला. सामन्यातील वेग आणि आक्रमकता कायम राखत 57 व्या मिनिटाला अजितेश रॉयने आणखी एक गोल करून आयकरच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर, दुसऱ्या सामन्याच पीसीएमसी संघाने अजिंक्य नाईकनवरेच्या दोन गोलच्या जोरावर फ्रेण्डस युनियन संघाचा 4-1 असा पराभव केला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला ऋतिक कांबळे आणि 30व्या मिनिटाला सौरभ पाटिलने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून पीसीएमसी संघाला मध्यंतराला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात पीसीएमसी संघाने आणखी दोन गोल केले. अजिंक्यने 44 आणि 54 व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी भक्कम केली. या दरम्यान 52व्या मिनिटाला अफताब शेखने गोल करून फ्रेंडस युनियनचे खाते उघडले होते.
त्यापूर्वी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा समितीचे अध्यक्ष महेंद्र निकाळजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. या वेळी दीपा निकाळजे आणि स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष सुनिल रणपिसे उपस्थित होते.
निकाल –
आयकर, पुणे 5 (निखिल नंदनदोरी 18वे, आशुतोष लिंगेश 20वे, अथर्व कांबळे 28वे, 37वे आणि अजितेश रॉय 57वे मिनिट) वि.वि. हॉकी लव्हर्स अकादमी 0. मध्यंतर 3-0
पीसीएमसी अकादमी 4 (ऋतिक कांबळे 26वे, सौरभ पाटिल 30वे (कॉर्नर), अजिंक्य नाईकनवरे 44, 54वे मिनिट) वि.वि. फ्रेंण्डस युनियन 1 (अफताब शेख 52वे मिनिट) मध्यंतर 2-0
महत्वाच्या बातम्या-
‘तुझ्याकडे पैसा जास्त आणि माझ्याकडे…’, ब्रावोने पोलार्डला पुन्हा केले ट्रोल, पाहा व्हिडिओ
भारतीय संघ कसा संपवणार 10 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा वनवास? विंडीजच्या दिग्गजाने सांगितला अनोखा फॉर्म्युला