भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला असता, तेथे दोन सामन्यांची टी२० मालिका खेळण्यात आली. भारताने ही मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली २-०ने जिंकत आयर्लंडविरुद्ध टी२० सामने जिंकण्याचा विक्रम कायम राखला आहे. हे सामने पाहण्यासाठी भारतीय संघाच्या चाहत्यांची संख्या अधिक असेल असे विधान आयर्लंडचा कर्णधार अँड्रयू बालबर्नी याने मालिकेपूर्वी केले होते. झालेही तसेच, या सामन्यांमध्ये भारतीय संघाला प्रोत्हासन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. हे विशेष नसून भारतीय संघाचे चाहते जगभरात आहेत.
भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी चाहते नेहमीच भन्नाट युक्त्या लढवत असतात. याचाच प्रत्यय आयर्लंड दौऱ्यावर गेलेला भारताचा मध्यम फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला आला. सामन्यादरम्यान एका चाहत्याने ‘सूर्यकुमारला पाहण्यासाठी मुंबईवरून डबलिनला आलो’ असे लिहिलेले पोस्टर दिसले. सूर्यकुमारनेही त्याला न टाळता सामन्यानंतर त्या चाहत्याची भेट घेतली.
सूर्यकुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करत त्या चाहत्याचे आभार मानले आहे. याबरोबरच त्याने फोटोही पोस्ट केला असून त्या चाहत्याने ‘सूर्यादादा’ लिहिलेला पोस्टरही त्यामध्ये आहे. सूर्याने त्यांना एक बॅटही भेट दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले, ‘आम्ही जेथे जातो तेथे तुम्ही आम्हाला समर्थन देण्यासाठी उपस्थित असता, ही आमच्यासाठी अनमोल आणि हृद्यस्पर्शी बाब आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.’
Seeing such immense support everywhere we go is truly heartwarming ♥️
Big thank you to you all for always having our back 🙌 pic.twitter.com/8UvuaLlDfe— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) June 29, 2022
या दौऱ्यात सूर्यकुमारने दोन टी २० सामने खेळले. दुखापतीतून सावरल्यावर त्याचे भारतीय संघात निराशाजनक पुनरागमन झाले. यामध्ये त्याची प्रचंड निराशा झाली. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात १५ धावा केल्या होत्या.
आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामातही तो दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकला होता. नंतर दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेमध्ये तो खेळला नव्हता. यामुळे त्याचे आयर्लंड विरुद्ध मोठी खेळी करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले.
भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आणि वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या सहाही सामन्यात सूर्यकुमारचा समावेश आहे. त्याच्यासाठी ही मोठी संधी असून तो यामध्ये चांगली खेळी करेल याची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvSL।श्रीलंकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारलीय?
श्रीलंकेविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने मोडला कपिल पाजींचा रेकॉर्ड, वाचा सविस्तर
एकाच दिवशी केला डेब्यू, पण एक ठरला ‘राजा’ अन् दुसरा ठरला ‘रंक’, पाहा यादी