भारतीय क्रिकेट संघाची आयर्लंड दौऱ्यासाठी बुधवारी (१५ जून) घोषणा झाली आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी १७ जणांच्या संघात राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात दोघांनी उत्तम कामगिरी करत संघात जागा निर्माण केली आहे. यावेळी काही खेळाडूंकडे निवड अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने त्या खेळाडूंनी निराशा व्यक्त केली आहे.
राहुल तेवातिया (Rahul Tewatia) याची भारतीय संघात निवड झाली नाही. या वृत्तेने दु:खी होत त्याने ट्वीटरवर ‘आशा धरल्याने दु:ख’ भावुक संदेश ट्वीट करत दुख व्यक्त केले आहे.
Expectations hurts 😒😒
— Rahul Tewatia (@rahultewatia02) June 15, 2022
पंधराव्या आयपीएल हंगामातील राहुल विजेत्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून खेळला आहे. त्यादरम्यान त्याने स्फोटक फलंदाजी करत संघाला अनेक सामने जिंकून दिली आहेत. त्याने १६ सामन्यात १४७.६२च्या स्ट्राईक रेटने २१७ धावा केल्या आहेत.
राहुलने २०२२च्या आयपीएलमध्ये गुजरातसाठी दोन सामन्यात फिनीशरची भुमिका पार पाडली आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध त्याने ओडियन स्मिथ गोलंदाजीवर शेवटच्या दोन चेंडूवर षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला होता. हा सामना संपल्यावर भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांनी त्याचे कौतुक केले होते. त्याच्या पुढच्याच सामन्यात त्याने २१ चेंडूत ४० धावा केल्या होत्या.
आठ आयपीएलचे हंगाम खेळणाऱ्या २९ वर्षीय राहुलला भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. त्याने २०१४मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
आयर्लंड दौऱ्यातून सॅमसनने भारतीय संघात पुनरागमन केले असून त्रिपाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेतील २६ जूनला पहिला टी२० आणि २८ जूनला दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचे ‘हे’ शिलेदार आयर्लंड विरुद्ध खेळताना करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात ३ यष्टीरक्षकांची निवड, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण बनवणार जागा?
आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० सामन्यात फिक्स सलामीला उतरणार ‘हे’ दोन खेळाडू