भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून(7 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात प्रत्येकी दोन बदल करण्यात आले आहेत .ऑस्ट्रेलियाने अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व विल पुकोवस्कीला संघात स्थान दिले आहे, तर भारताकडून रोहित शर्मा व नवदिप सैनीला संधी देण्यात आली आहे. वॉर्नर आणि पुकोवस्कीला जो बर्न्स आणि ट्रेविस हेड ऐवजी संघात स्थान मिळाले आहे. तर रोहित शर्मा आणि नवदिप सैनीला मयंक अगरवाल आणि उमेश यादव ऐवजी संघात स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलिया व भारतीय संघाकडून प्रत्येकी एक खेळाडू आपले कसोटी पदार्पण करत आहे. ऑस्ट्रेलियाकडून युवा सलामीवीर विल पुकोवस्की तर भारताकडून वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करत आहेत. सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे असणार आहेत.
भारत –
रोहित शर्मा (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत(यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया –
डेविड वॉर्नर, विल पुकोवस्की, मार्नस लॅब्यूशाने, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, टीम पेन(कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, जोस हेजलवूड, मिशेल स्टार्क, नॅथन लायन.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅग्राच्या कॅन्सर जागृती उपक्रमासाठी ‘या’ भेटीसह सचिनने दिल्या खास शुभेच्छा