---Advertisement---

चाहता नंबर १..! विलियम्सनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी ‘त्याने’ अर्ध्यातच थांबवली पत्रकार परिषदेत, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जानेवारी 6, 2021 11:26 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील चमकदार कामगिरीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान तर पटकावलेच; सोबतच त्याने क्रिकेट रसिकांच्या मनातही घर केले आहे. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने एक शतक आणि एक द्विशतक ठोकले आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द सीरिज’ म्हणजे मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विलियम्सनच्या धडाकेबाज फलंदाजीचा त्याचा एक संघसहकारीही चाहता बनला आहे. या संघसहकाऱ्याचे नाव बीजे वॅटलिंग असून तो न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे. नुकताच आयसीसीने वॅटलिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे वॅटलिंगला नेटकऱ्यांनी विलियम्सनचा सर्वात मोठा चाहता म्हणायला सुरुवात केली आहे.

वॅटलिंगने अर्ध्यातच थांबवली पत्रकार परिषद

झाले असे की, न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील कसोटी मालिका संपल्यानंतर विलियम्सन पत्रकारांशी बोलत होता. दरम्यान गोंधळ ऐकू आल्याने विलियम्सन इकडेतिकडे पाहू लागला. तेवढ्यात वॅटलिंग त्याची जर्सी घेऊन धावत आला. हे पाहून विलियम्सनने त्याला काय चालू आहे?, असे विचारले.

पुढे वॅटलिंगच्या हातात पेन आणि जर्सी पाहून विलियम्सनला कळाले की, वॅटलिंग त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला आहे. हे पाहून विलियम्सन हसला आणि पत्रकारांची माफी मागत त्यांना थोडा वेळ थांबायला सांगितले. यावेळी वॉटलिंग म्हणाला, ‘मोठा फॅन’ त्यानंतर विलियम्सनने आनंदाने वॅटलिंगला ऑटोग्राफ दिला आणि पुन्हा पत्रकारांशी बोलण्यात व्यस्त झाला.

वॅटलिंगच्या या हरकतीला पाहून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. सोबतच काही नेटकऱ्यांनी विलियम्सनची प्रशंसा करत त्याला जेंटलमन म्हटले आहे.

केन विलियम्सनची कसोटी मालिकेतील कामगिरी

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात २६ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान २ सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विलियम्सनने शतकी खेळी केली होती. पहिल्या डावात १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने १२९ धावा केल्या होत्या. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे न्यूझीलंडने १०१ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला.

तर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विलियम्सनने झुंजार द्विशतक ठोकले. ३६४ चेंडूत २८ चौकारांच्या मदतीने केलेल्या त्याने २३८ धावां केल्या होत्या. यामुळे न्यूझीलंडने अंतिम सामन्यात १ डाव आणि १७६ धावांनी पाकिस्तानला पराभूत केले. अशाप्रकारे न्यूझीलंडने २-० ने ही मालिका जिंकली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बापरे…! तब्बल ११ खेळाडूंनी अजिंक्यच्या नेतृत्वात केले आहे आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण

का दिलं जातय स्मिथ आणि लॅब्यूशानेतील नात्याला ब्रोमान्सचं नाव? वाचा

“मला फोन करून सांगितले की सामना मुंबईत होईल तरी मला काही फरक पडणार नाही”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---