---Advertisement---

फलंदाजीला येण्याआधी कार्तिकला कोसले मग…! शेवटच्या चेंडूची कहानी अश्विनकी जुबानी

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 12:11 PM
DK & R Ashwin
---Advertisement---

टी20 विश्वचषकात (T20 World Cup)भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्ध तुफानी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या आर अश्विन याचेही त्यामध्ये महत्वाचे योगदान होते. आता अश्विनने एक चेंडू खेळत एक धाव केली यामध्ये कसले आले योगदान, तसे नाही ती एक धाव भारताच्या विजयाचे कारण ठरली. त्या शेवटच्या चेंडूआधी काय घडले ज्यामुळे अश्विनने दिनेश कार्तिक याला नको-नको ते बोलले. जाणून घेऊ त्या सामन्याच्या शेवटच्या चेंडूची गोष्ट.

आर अश्विन (R Ashwin) जेव्हा फलंदाजासाठी आला तेव्हा भारताला विजयासाठी एका चेंडूवर दोन धावांची आवश्यकता होती. त्यात विराट कोहली (Virat Kohli) नॉन-स्ट्राईकर एंडला आणि अश्विन क्रिझवर होता. अश्विनने नवाजच्या त्या वाईड चेंडूवर आणि दिनेश कार्तिकच्या बाद होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अश्विनने डोक्याने काम केले, ज्यामुळे मोहम्मद नवाज याच्या चेंडूला वाईड ठरवले गेले. अश्विनला माहित होते की नवाज त्याच्या पॅडवर चेंडू टाकेल आणि यामुळेच तो न हलता तसाच जागेवर उभा राहिला आणि चेंडू थोडा बाहेर गेला, त्यालाच पंचांनी वाईड दिले. याच चेंडूबाबत बोलताना अश्विन म्हणाला, “जेव्हा चेंडू लेग साइडवर जात होता, तेव्हाच मी ठरवले हा खेळायचा नाही. त्याला वाईड ठरवले आणि आम्हाला एक अतिरिक्त धाव मिळाली तेव्हा मला बरे वाटले.”

“जेव्हा मी फलंदाजीला जात होतो, तेव्हा सर्वात आधी तर मी दिनेश कार्तिकला बरे-वाईट बोललो आणि मग विचार केला, नाही…नाही आपल्याकडे अजून एक संधी आहे. जे करायला आपण आलो आहोत ते करूया. मग मी विराटकडे पाहिले, त्याने मला पुष्कळ काही सांगितले. तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट आली, देवाने आज विराटला काहीतरी दिले असून मला ते का निराश करतील. विराटने हॅरीस रउफच्या गोलंदाजीवर षटकार खेचले मला तर काहीच धावा करायचा आहेत. तेव्हाच मी ठरवले चेंडूला नीट पाहिल आणि गॅपमध्ये खेळेल. जेव्हा मी ती विजयी धाव घेतली तेव्हा मला आनंद झाला कारण कोणीही माझ्या घरावर दगडफेक करणार नाही (हसताना), असेही अश्विनने म्हटले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा नकोसा विक्रम, टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले कांगारूंसोबत
भारताची आयसीसीकडे तक्रार! सिडनीमध्ये दुपारच्या जेवणात काय होते ज्याने खेळाडू भडकले?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---