भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा सामना दुबई येथे खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाकिस्तानला 147 धावांवर सर्वबाद केले. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी सुरू होतात भारताला दुसऱ्या चेंडूवर पहिला धक्का बसला.
Wicket off just his second delivery! ????
KL Rahul is Naseem Shah's maiden T20I wicket ☝️#AsiaCup2022 | #INDvPAK pic.twitter.com/bJhmJYtktg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 28, 2022
पाकिस्तानने दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. पाकिस्तानसाठी पदार्पण करत असलेल्या वेगवान गोलंदाज नसीम शाहने गोलंदाजीची जबाबदारी सांभाळली. रोहितने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून दिल्यानंतर राहुल स्ट्राइकवर आला. मात्र, शहाचा वेगवान चेंडू त्याच्या बॅटला लागून थेट स्टंप्सवर आदळला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली हा देखील बाहेरचा चेंडू छेडताना दिसला. मात्र, त्याच्या बॅटला लागून उडालेला चेंडू झेलण्यात स्लिपमधील फखर झमानला अपयश आले.






