भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या टी20 सामन्यात पराभूत केले. रविवारी (2 ऑक्टोबर) गुवाहाटी येथे खेळला गेलेला हा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. यामुळे भारताने तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली यांनी चमकदार खेळी केली. तसेच मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने मालिका खिशात घातली असली तरी, या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.
भारतीय संघाचा विचार केल्यास भारतीय संघाची फलंदाजी सक्षम दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा छोट्या मात्र प्रभावी खेळ्या करताना दिसतोय. केएल राहुलने सलग दोन सामन्यात अर्धशतके ठोकून फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. मधल्या फळीत विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्यामुळे संघ ताकदवान भासतोय. तसेच अक्षर पटेल हा गोलंदाजीत एकमेव प्रभावी पक्ष आहे.
इंदोर टी20 मध्ये आत्तापर्यंत फलंदाजीचे संधी न मिळालेल्या रिषभ पंत याला वरच्या क्रमांकावर फलंदाजी संधी मिळू शकते. दुसऱ्या सामन्यात केवळ 7 चेंडू खेळायला मिळालेला दिनेश कार्तिक देखील तिसऱ्या सामन्यात जास्त वेळ मैदानावर दिसू शकतो. मागील दोन मालिकांपासून संघासह असलेला अष्टपैलू शहाबाझ अहमद या सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास हर्षल पटेल याला विश्वचषकापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याचा हा अखेरचा मौका असेल. तसेच अर्शदीप सिंग याला आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवावे लागेल. या सर्वांमध्ये भारतीय संघासाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे दीपक चहर याचे सातत्य. तो बळी घेण्यात तसेच धावा रोखण्यात दोन्ही सामन्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, त्याचा विश्वचषकासाठीच्या मुख्य संघात समावेश नाही. जसप्रीत बुमराह वेळीच दुखापतीतून सावरला नाही तर, त्याच्या जागी दीपकला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अखेरच्या सामन्यात संघ व्यवस्थापन युजवेंद्र चहल व रविचंद्रन अश्विन या दोघांना देखील एकत्र खेळवू शकते.
इंदोर टी20 साठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, शाहबाझ अहमद, हर्षल पटेल, दीपक चहर, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘ते 17 वर्षांनंतर आले तर त्यांना रिकाम्या…’ पाकिस्तान हरल्यावर हे काय बोलून गेले पीसीबी अध्यक्ष
T20WC: बुमराहबद्दल ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मोठे भाष्य! म्हणाला, ‘भारताला जिंकण्यासाठी त्याचे संघात…’