जोहान्सबर्ग। भारताने पहिल्या टी २० सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात पुन्हा एकदा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी संघाच्या मदतीला धावून आलेला दिसला. जेव्हा पहिल्या टी२० सामन्यात ७व्या षटकात हार्दीक पंड्या गोलंदाजी करत होता तेव्हा दुसरा चेंडू त्याने बांउसर टाकला परंतु हा चेंडू जरा जास्तच हवेत असल्याने पंचांनी तो वाईड म्हणून घोषीत केला. यामुळे धोनी मात्र चांगलाच संतापलेला दिसला.
धोनी यावेळी पंड्याला डोकं वापर आणि लक्ष देऊन गोलंदाजी कर असे हावभाव करताना दिसला. तसेच डोकं शांत ठेवून गोलंदाजी करण्याचा सल्लाही तो देताना दिसला.
https://twitter.com/AlauddinKhilj10/status/965515147849551872
विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच चेंडूवर डेवीड मिलर बाद झाला. यामूळे धोनीचे मात्र जोरदार कौतूक होत आहे.