---Advertisement---

राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर, कोमल देवकर, दादासो आवाड यांच्याकडे संघाचे नेतृत्व

On: मंगळवार, फेब्रुवारी 20, 2018 2:49 PM
---Advertisement---
महाराष्ट्राने आंध्र प्रदेश येथील गुटूर जिल्ह्यात होणाऱ्या  १० व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी आज आपल्या संघाची घोषणा केली. मुं.उपनगरच्या कोमल देवकरकडे महिला, तर नंदुरबारच्या दादासो आवाडकडे पुरुष संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
सध्या हे दोन्ही संघ अलिबाग येथे सराव करीत आहेत. कोमल देवकरने राष्ट्रीय स्पर्धेपासून आतापर्यंत महाराष्ट्र संघात आपले स्थान कायम राखले आहे. शिवाय नेतृत्वाची माळ देखील आपसूक तिच्या गळ्यात पडली आहे. नुकताच तिला महाराष्ट्र शासनाच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला.
मुं. शहरच्या एकाही खेळाडूला या महिला संघात  स्थान नाही. रत्नागिरीच्या श्रद्धा पवारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्यात आला आहे. पुरुषांचा संघ पूर्ण नवीन पाठविण्यात आला आहे.  शुक्र. दि. २३फेब्रु.२०१८ रोजी सकाळी विजयवाडा एक्सप्रेसने हे संघ स्पर्धेकरिता रवाना होतील. अशी माहिती राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी दिली.  त्याच बरोबर त्यांनी जाहीर केलेले संघ खालील प्रमाणे:-
महिला संघ:- १) कोमल देवकर – संघनायिका (मुं.उपनगर), २)माधुरी गवंडी (ठाणे), ३) अंकिता जगताप (पुणे), ४) श्रद्धा पवार (रत्नागिरी), ५) राणी उपहार (मुं. उपनगर), ६) मोनाली घोंगे ( रायगड)
प्रशिक्षक :- संतोष शिर्के (रत्नागिरी); व्यवस्थापिका :- श्रीम. वनिता दळवी (पुणे)
पुरुष संघ :- १)दादासो आवाड – संघनायक ( नंदुरबार), २) ओमकार जाधव ( मुं. शहर ), ३) बिपीन थळे ( रायगड ), ४) निशिकांत पाटील ( ठाणे), ५) आशिष मोहिते ( मुं. उपनगर ), ६) प्रमोद घुले ( पुणे ).
प्रशिक्षक :-  दिनेश पाटील ( मुं. शहर ), व्यवस्थापक :- प्रथमेश पाटील ( रायगड ).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment