---Advertisement---

INDvSA: काय सांगता, संजू सॅमसनने वनडेमध्ये सरासरीत विराट-धोनीला टाकले मागे

On: शुक्रवार, ऑक्टोबर 7, 2022 11:48 AM
Sanju Samson
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला गेला. हा सामना भारताने केवळ 9 धावांनी गमावला. यामुळे दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यावेळी भारताचा विकेटकीपर संजू सॅमसन याने विलक्षण खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणरा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. तसेच त्याने वनडे सरासरीच्या बाबतीत विराट कोहली आणि एमएस धोनी यांनादेखील मागे टाकले आहे.

संजू सॅमसन (Sanju Samson) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची अवस्था 4 बाद 51 अशी होती. त्याने श्रेयस अय्यर याच्यासोबत 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने अय्यरची विकेट गेल्यावर आपल्या खेळीचा वेग वाढवत शार्दुल ठाकुर यांच्यासोबत 93 (66 चेंडू) धावांची भागीदारी केली. संजूने 63 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 3 षटकार खेचले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची संजूची खेळी ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली आहे. त्याचबरोबर त्याने ही खेळी करताना भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताचा सर्वाच यशस्वी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) यांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर शुबमन गिल यालाही मागे टाकले आहे.

झाले असे की, संजूने 2021मध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण करताना ते आतापर्यंत 8 वनडे सामने खेळले आहे. त्यातील 7 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 65.50च्या सरासरीने 262 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर त्याने भारतासाठी वनडे कारकिर्दीतील फलंदाजांच्या सर्वोच्च सरासरीमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. या यादीत गिल 62.75 सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर विराट 57.68 आणि धोनी 50.68 सरासरीसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

भारतासाठी वनडे कारकिर्दीतील फलंदाजांची सर्वोच्च सरासरी (किमान 7 डाव)
65.50 – संजू सॅमसन
62.75 – शुबमन गिल
57.68 – विराट कोहली
50.68 – एमएस धोनी

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup: आज पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड्स
INDvSA: आठवीच वनडे खेळणाऱ्या संजूचा कॅप्टन कूलच्या ‘त्या’ विक्रमाला धक्का! द्रविड, पंतला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---