---Advertisement---

IND vs AFG । होळकर स्टेडियमवर भारतापुढे 173 धावांचे लक्ष्य, शेवटच्या चेंडूवर अफगाणिस्तान सर्वबाद

Axar Patel
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी-20 सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 20 षटकांमध्ये 172 धावा करून सर्वबाद झाला. गुलबदिन नायब याने 57 धावांची सर्वोत्तम खेळी अफगाणिस्तानसाठी केली. दुसरीकडे भारतासाठी अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी महत्वाच्या विकेट्स घेतल्या. 

अफगाणिस्तान संघ या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आला. सलामीवीर फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याने 14, तर इब्राहीम झद्रान 8 धावा करून बाद झाले. गुलबदीन नायब याने तिसऱ्या क्रमांवर खेळताना 35 चेंडूत 57 धावांची सर्वोत्तम खेळी केली. गुरबाजच्या रुपात भारताला पहिली विकेट रवी बिश्नई याने मिळवून दिली. तर झद्रान आणि नायब याला अक्षर पटेलने बाद केले.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आजमतुल्ला उमरझाई अवघ्या दोन धावा करून शिवम दुबेची शिकार बनला. मोहम्मद नबी याने 18 चेंडूत 14 धावा करून रवी बिश्नईला विकेट दिली. नजीबुल्लाह झद्रान याने 23 आणि करीम जनात 20 धावा करून अर्शदीप सिंग याच्या चेंडूवर बाद झाले. मुजीब उर रहमान याने 21 धावांची खेळी केल्यानंतर यष्टीरक्षक जितेश शर्माने त्याला बाद केले. नूर अहमद एक धाव करून अर्शदीच्याच चेंडूवर बाद झाला. फजहल फारुकी याच्या रुपात अफगाणिस्तान संघाने शेवटची गमावली.

(IND vs AFG 2nd t20i India need 173 to win the T20i series against Afghanistan)

भारतीय संघासाठी अर्शदीप सिंग याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. शिवम दुबे याला एक विकेट मिळाली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
अफगाणिस्तानः
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह झदरन, करीम जनात, गुलबदीन नायब, नूर अहमद, मुजीब उर रहमान, नवीन-उल- हक, फजलहक फारुकी.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

महत्वाच्या बातम्या – 
Ranji Trophy 2024 । रियान पराग ठरला वन मॅन आर्मी! कर्णधाराचे संघासाठी सलग दुसरे शतक
भारतासाठी ‘या’ दोघांनी ठोकली सर्वात वेगवान T20I शतकं, दोघांनी काढला श्रीलंकन गोलंदाजांचा घाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---