IND vs AFG 2nd T20: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज (14 जानेवारी) संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, त्यामुळे अफगाणिस्तानसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असेल.
मात्र, या सामन्यातही भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कारण आजपर्यंत अफगाणिस्तानचा संघ भारताला टी20 सामन्यात पराभूत करू शकलेला नाही. जर आपण खेळाडूंचेही तुलना केली तर अफगाणिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ खूप मजबूत दिसतो. (ind vs afg 2nd t20i match preview indore pitch report possible playing 11)
भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आतापर्यंत 6 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भिडले आहेत. येथे अफगाण संघाने 5 सामने गमावले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. येथे, इंदूरबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने येथे आतापर्यंत तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. येथे त्याने दोन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. भारताने येथे श्रीलंकेला दोन सामन्यात पराभूत केले आहे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना गमावला आहे.
इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी सपाट आहे, आउटफिल्ड वेगवान आहे आणि चौकारही लहान आहेत, याचा अर्थ ही विकेट फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. येथे झालेल्या पांढऱ्या चेंडूच्या सर्व सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. आजही असेच काहीसे घडणार आहे. या मैदानावर झालेल्या तीन टी20 सामन्यांमध्ये दोनदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सव्वा दोनशेहून अधिक धावा केल्या आहेत. या मैदानावर आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वोच्च धावसंख्या ही 260 आहे.
या सामन्यात भारत काही बदल करू शकतो. विराट कोहली टिळक वर्मा याची जागा घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शुबमन गिल याच्या जागी यशस्वी जयसवाल याला संधी मिळू शकते. गोलंदाजीत रवी बिश्नोई याच्या जागी कुलदीप यादव याला प्लेइंग-11 मध्ये आणि मुकेश कुमार याच्या जागी आवेश खान याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकते. अफगाणिस्तान संघात बदल होण्याची शक्यता दिसत नाही. (IND vs AFG India-Afghanistan clash in Indore today see how the pitch will be and teams possible playing XI)
भारताची संभावीत प्लेइंग-11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल/शुबमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान/मुकेश कुमार.
अफगाणिस्तानची संभावीत प्लेइंग-11: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झझाई/रहमत शाह, इब्राहिम झदरान (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरान, करीम जन्नत, गुलबद्दीन नैब, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फझलहक फारूकी,
हेही वाचा
‘आता कोणी रोखून दाखवा’, भारतीय संघात निवड झालेल्या युवा फलंदाजाबद्दल मित्राची लक्षवेधी पोस्ट
Video: इतिहासात पुन्हा असा कॅच होणे नाही! सामन्यादरम्यान फिल्डरने घेतला डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच