IND vs AFG 2nd T20I: कुलदीप यादवने अनेक वेळा भारतीय संघासाठी शानदार गोलंदाजी केली आहे. टी-20 फॉरमॅटमध्येही त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या मोहाली टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीपला स्थान दिले नाही. मात्र, त्याला इंदोर येथे होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात संधी दिली जाऊ शकते. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर कुलदीपचा टी-20 रेकॉर्ड चांगला आहे. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाल्यास अफगाणिस्तानच्या अडचणी वाढू शकतात.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा इंदोरमध्ये भारताकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. चहलने एका सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूर याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 3 विकेट्स घेतल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंदोरमध्ये पुन्हा एकदा टी-20 सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कदाचित या सामन्यात कुलदीपला संधी मिळू शकते. कुलदीपने नुकतेच सांगितले होते की, त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येथे भरपूर क्रिकेट खेळले आहे. (ind vs afg kuldeep yadav may will be in playing 11 against afghanistan 2nd t20 indore)
भारताकडून मोहाली टी-20 सामन्यात मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या होत्या. तर शिवम दुबे (Shivam Dube) याला एक विकेट्स घेण्यात यश मिळाले. अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) याला एकही विकेट मिळाली नाही. पण त्याने चांगली गोलंदाजी केली. इंदोरमध्ये होणाऱ्या सामन्यात भारताने कुलदीपला संधी दिल्यास रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याला ब्रेक दिला जाऊ शकतो. बिश्नोईने गेल्या सामन्यात 3 षटके टाकली. यामध्ये त्याने 35 धावा दिल्या. तर त्याला एकही विकेट घेता आली नाही. इंदोर हे आवेश खान (Avesh Khan) याचे शहर आहे. पण सध्यातरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल असे वाटत नाही. (IND vs AFG Kuldeep proved to be very dangerous in Indore could be trouble for Afghanistan team)
हेही वाचा
IND vs ENG Test: ‘राहुल इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षण करणार नाही?’ पाहा बीसीसीआयने का घेतला निर्णय
आयपीएल सर्वांसाठी खास; यातूनच टी20 विश्वचषक संघ निवडला जाईल, इंदोर टी-20पूर्वी शिवम दुबेचे वक्तव्य