अॅडलेड | टी२० मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका (india vs australia 2018 test series) सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे खेळवला जाणार आहे. यापुर्वी टीमं इंडिया आॅस्ट्रेलिया ११ विरुद्ध सराव सामना सिडनी येथे खेळणार आहे.
परंतु पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हनुमा विहारीला (Hanuman Vihari) खेळवावे असे मत माजी क्रिकेटर सुनिल गावसकरांनी (Sunil Gavaskar) व्यक्त केले आहे.
गावसकर म्हणतात-
“मला वाटते की पहिल्या कसोटीत रोहित शर्मा ऐवजी हनुमा विहारी खेळवले पाहिजे. गेल्याच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. यापुर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध भारत अ कडून सामनेही खेळले आहेत. जर एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याला संघात संधी द्यायला हवीच. जर संघ दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज घेऊन खेळणार असेल तर हनुमा विहारी गोलंदाजीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
–टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील
–तब्बल ५५ वर्षांनंतर पुन्हा घडला तो इतिहास