भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील वनडे मालिका खेळत आहे. रविवारी (24 सप्टेंबर) मालिकेतील दुसरा वनेड सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. सीमारेषा जवळ असलेल्या या मैदानात भारतीय फलंदाजांनी पाहुण्या संघाचा चांगलाच घाम काढला. भारताच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या केएल राहुलचा एक शॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विश्रांतीवर आहे. रोहितच्या अनुपस्थितीत संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुल याच्याकडे सोपवली गेली. रविवारी (24 सप्टेंबर) राहुलने मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात 52 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि तीन अप्रतिम षटकार मारले. भारताच्या डावातील 34 व्या षटकात कॅमरून ग्रीन गोलंदाजी करत होता. षटकातील तिसरा चेंडू राहुलने अप्रतिम पद्धतीने मारला, जो थेट होळकर स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला. 94 मीटरचा हा षटकार होता. बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून राहुलच्या षटकाराचा हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
सामन्याच्या विचार केला, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतासाठी शुबमन गिल (104) आणि श्रेयस अय्यर (105) यांनी वैयक्तिक शतके केली. तसेच कर्णधार केएल राहुल (52) आणि सूर्यकुमार यादव (72*) यांनीही अर्धशतकी योगदान दिले. कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा खर्च करणारा (103 धावा) आणि सर्वाधिक विकेट्स (2 विकेट्स) घेणारा गोलंदाज ठरला. (IND vs AUS 2nd ODI KL Rahul’s out of the park)
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
महत्वाच्या बातम्या –
इंदोरमध्ये टीम इंडियाकडून धावांची बरसात! ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे लक्ष
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद