---Advertisement---

तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11

On: रविवार, सप्टेंबर 25, 2022 12:16 PM
Rishabh-Pant-Rohit-Sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)यांच्यात रविवारी (25 सप्टेंबर) मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला गेला. हा सामना पावसामुळे प्रत्येकी 8-8 षटकांचा खेळला गेला. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. षटकांची संख्या कमी असल्याने भारताच्या संघात रोहित शर्मा याने एक गोलंदाज कमी खेळवून रिषभ पंत याला संघात घेतले, मात्र हैद्राबादमध्ये रोहित पुन्हा एकदा 5 गोलंदाजासह मैदानात उतरेल.

दोन्ही संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. यामुळे मालिका बरोबरीत आली आहे. म्हणूनच मालिकाविजयाच्या दृष्टीने हैद्राबदचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ त्यांच्या उत्तम अंतिम अकरा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहेत.

नागपूरच्या टी20 सामन्यात भारत जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल या चार गोलंदाजांना खेळवले. तर हार्दिक पंड्या याने अष्टपैलूची भुमिका पार पाडला. रोहित शर्मा महत्वाच्या सामन्यात कोणतीही जोखीम नाही घेऊ शकत. यामुळे तो हार्दिक आणि आणखी पाच गोलंदाज यांना संघात घेण्याची शक्यता आहे. जर एका अधिक गोलंदाजाला संघात घेतले तर रिषभ पंत याचे संघाबाहेर होणे निश्चित आहे.

भारताकडे भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर हे तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. उमेश यादव संघात असला तरी टी20 विश्वचषकामध्ये त्याला घेतले नाही, अशा स्थितीत रोहित कदाचित भूवनेश्वर किंवा दीपक यांना घेण्याचा विचार करेल. दीपक हा टी20 विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये आहे. तसेच भुवनेश्वरला आशिया चषक 2022च्या स्पर्धेत संधी मिळाली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी20 साठी भारताची की संभावित प्लेइंग इलेवन- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार/दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सर्वप्रथम कोणी केले मंकडीग? नावातच दडलयं रहस्य, आयसीसीचा नियमही घ्या जाणून
INDvAUS: क्रिकेटच्या मैदानातही झळकले ’50 खोके एकदम ओके’चे बॅनर, वाचा सविस्तर
थोडक्यात वाचला हॅरी ब्रुक! हेलमेटच्या ग्रीलमध्ये अडकला चेंडू, पाक गोलंदाजाची रिएक्शन व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---