भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्वबाद 369 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने या प्रत्युत्तरादाखल आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 33 धावांची आघाडी घेतली. मात्र तुम्हाला माहित आहे का, 33 हा आकडा ऑस्ट्रेलिया संघाला अशुभ आहे.
या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 115.2 षटकात सर्वबाद 369 धावा केल्या होत्या. यामध्ये मार्नस लॅब्यूशानेने ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 204 चेंडूचा सामना करताना 9 चौकार ठोकत 108 धावांची शतकी खेळी होती. त्याचबरोबर टीम पेनने 104 चेंडूचा सामना करताना 50 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 369 धावांचा डोंगर उभा केला होता.
या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सुरुवातीला 186 धावा करताना 6 गडी गमावले होत. मात्र त्यांनंतर शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाने 111.2 षटकांत सर्वबाद 336 धावा करू शकला. भारतीय संघाकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 115 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 67 धावांची खेळी केली. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने 144 चेंडूचा सामना करताना 7 चौकार 1 षटकार ठोकत 62 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ 336 धावा करू शकला.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 33 धावांची आघाडी घेतली. परंतु 33 हा आकडा ऑस्ट्रेलिया संघासाठी अशुभ आहे. या अगोदर ही ऑस्ट्रेलिया संघाने दोनदा 33 धावांची आघाडी घेतली होती. मात्र या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासाठी हा आकडा अशुभ आहे.
भारतीय संघ 2003-04 साली ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला होता. त्या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे एक सामना ऍडलेड येथे खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम खेळताना पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 523 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 33 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र ऑस्ट्रेलिया संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात 1979-80 साली एक कसोटी झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 33 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल
ब्रिस्बेन कसोटीतील वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ खेळीनंतरही वडील निराश, काय आहे यामागचं कारण
स्मिथनंतर आता रोहितही दिसला क्रिजमध्ये शाडो बॅटिंग करताना, व्हिडिओ होतोय व्हायरल