---Advertisement---

स्मिथनंतर आता रोहितही दिसला क्रिजमध्ये शाडो बॅटिंग करताना, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 10:09 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा क्रिजवर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथप्रमाणे शाडो बॅटिंग करताना दिसला. ही घटना सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिले सत्र संपण्याआधी घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

खरंतर सिडनी येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान स्मिथ शाडो बॅटिंग (काल्पनिक चेंडूंचा विचार करुन फलंदाजीचा सराव) करताना दिसला होता. दरम्यान तो सेंटर मार्क करतानाही दिसला. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसेच अनेकांनी त्याच्यावर भारतीय फलंदाजांचा बॅटिंग मार्क पुसण्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आता ब्रिस्बेन येथे होत असलेल्या चौथ्या कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्मिथ युवा कॅमेरॉन ग्रीनसह फलंदाजी करत असताना रोहित क्रिजवर जाऊन शाडो बॅटिंग करताना दिसला. रोहित स्मिथला सिडनी कसोटीच्या घटनेवरुन चिडवत असल्याचे अनेकांचे मत आहे. पण आता यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच समालोचनादरम्यान संजय मांजरेकर यांनी या घटनेबद्दल म्हटले आहे की ‘जर स्मिथ सिडनीमध्ये चूकला असेल तर रोहितही इथे चूकला आहे. तसेच ते म्हणाले की स्मिथने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही ते चांगले झाले.

https://twitter.com/AmanSin91546467/status/1351015710080819205

https://twitter.com/Smudge_scores/status/1350989860014862344

https://twitter.com/StanMSD/status/1351003937688727560

https://twitter.com/Dhanush_raj27/status/1350989062769954821

असे असले तरी नियमाप्रमाणे रोहित आणि स्मिथ क्रिजमध्ये शाडो बॅटिंग करु शकतात.

चौथ्या कसोटी सामन्यात स्मिथने दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ७४ चेंडूत ५५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने कॅमेरॉन ग्रीनसह ५ व्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. त्याच्याआधी या डावात डेविड वॉर्नरने ४८ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ६६ षटकात २४० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीमुळे त्यांनी त्यांची आघाडी २७० पर्यंत पुढे नेली आहे.

सिडनी कसोटीत स्मिथने बॅटिंग मार्क पुसण्याचा आरोप झाल्यानंतर पुन्हा एक नवीन व्हिडिओ समोर आला होता –

सिडनी कसोटीत ११ जानेवारीला स्मिथने बॅटिंग मार्क पुसण्याचा आरोप होत असलेल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एक व्हिडिओ २ दिवसात व्हायरल झाला होता. यात स्मिथने सेंटर मार्क करतानाची पूर्ण घटना दिसत होती. यात ब्रेक दरम्यान ग्राऊंड्समनने क्रिजवरील पट्टे मारल्यानंतर स्मिथ तिथे आलेला दिसत होता. यानंतर तो मार्क बनवत असल्याचे दिसले, त्यानंतर तिथे रिषभ पंत फलंदाजीसाठी आला.

ही घटना झाल्यानंतर स्मिथला त्याच्या संघसहकाऱ्यांकडून समर्थन मिळाले होते. तसेच कर्णधार टीम पेनने म्हटले होते की स्मिथ असं खुपदा करतो. तो नेहमीच क्रिजमध्ये असतो. आम्हाला माहित आहे ही स्मिथच्या नेहमीच्या सवयींपैकी एक आहे. त्यातील एक म्हणजे तो नेहमी त्याचे मार्क बनवत असतो.

तसेच स्मिथने म्हटले होते की ‘मला या प्रकारे आलेल्या प्रतिक्रियांमुळे धक्का बसला आहे आणि मी निराश झालो. आपण कुठे गोलंदाजी करतोय, फलंदाज ती गोलंदाजी कशी खेळतायेत, याचा विचार करण्यासाठी मी अशा गोष्टी सामन्यांदरम्यान करत असतो आणि मी नेहमीच्या सवयीप्रमाणे माझे सेंटर मार्क करतो.’

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकाच्या विकेटकीपरने चालू सामन्यात संघ सहकाऱ्याला मारली चापट, सेहवागने घेतली फिरकी

शार्दुल ठाकूर म्हणाला, फलंदाजी करताना रवि शास्त्री यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट होती लक्षात

ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, ‘आमची योजना होती की…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---