---Advertisement---

शार्दुल ठाकूर म्हणाला, फलंदाजी करताना रवि शास्त्री यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट होती लक्षात

On: रविवार, जानेवारी 17, 2021 10:59 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात तिसर्‍या दिवशी भारतीय संघातील शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाला तीनशे धावांचा टप्पा पार करता आला. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दूल ठाकूरने आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रीया दिली.

भारतीय संघाने आपला पहिला डाव खेळताना 186 धावसंख्येवर 6 गडी गमावले होते. त्यामुळे भारतीय संघ दबावात होता आणि ऑस्ट्रेलिया संघ जोमात होता. त्यामुळे अशावेळी भारतीय संघाला अत्यंत महत्त्वाची भागीदारी हवी होती. परंतु, भारतीय संघातील नियमित फलंदाज खराब फटके खेळून बाद झाले होते. त्यामुळे ही जबाबदारी नवोदित खेळाडू शार्दूल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर आली होती. या दोघांनी सुरुवातीला बचावात्मक फलंदाजी केली. त्यानंतर जम बसल्यावर या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली.

शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. यांमधे शार्दूल ठाकूरने 115 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 67 धावांची केली. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने 144 चेंडूचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत 62 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा केल्या. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दूल ठाकूरने प्रतिक्रिया दिली

शार्दूल ठाकूर म्हणाला, “जेव्हा मी मैदानावर गेलो, तेव्हा परिस्थिती अवघड होती आणि मी ही गोष्ट नाकारू शकत नाही. प्रेक्षक ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचा उत्साह वाढवत होते. मात्र मला आमचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी एकदिवसीय मालिकेपूर्वी सांगितलेली एक गोष्ट लक्षात होती. त्यांनी सांगितले होते, की जर तुम्ही या देशात प्रदर्शन केले, तर तुम्हाला सन्मान (प्रेक्षकांकडून) मिळेल.”

शार्दूल म्हणाला,” कोच म्हणाले होते की लोक तुमच्या कामगिरीने तुमच्यावर प्रेम करतील आणि त्यामुळे माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती. मला प्रेक्षकांकडून सन्मान मिळेल. दिवसाच्या खेळानंतर माझ्या संघाला माझी कामगिरी फायदेशीर ठरेल. माझ्यासाठी ही सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. माझ्या डोक्यात दोन गोष्टी होत्या. प्रेक्षक गोंधळ करतील मात्र जर मी चांगली फलंदाजी केली तर ते माझे कौतुक सुद्धा करतील. ”

शार्दूल ठाकूर बाद झाल्यानंतर प्रेक्षक आणि ड्रेसिंगरूममधील खेळाडूने शार्दूल ठाकूरला अभिवादन केले.

शार्दूल ठाकूर सांगितले त्याला फलंदाजी करायला आवडते आणि तो त्या संधीची वाट बघत होता. शार्दूल ठाकूर म्हणाला,” मी फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे. संघात जेव्हा ही थ्रो डाऊन विशेषज्ञाकडे वेळ असतो, तेव्हा मी सराव करतो. अशा क्षणासाठी तुम्ही मेहनत घेत असता. याची वाट बघता की संघासाठी काही करता येईल. फलंदाजीला करताना फक्त हा विचार होता की, जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर घालवायचा आहे. ज्यामुळे धावा काढता येथील आणि पहिल्या डावातील पिछाडी कमी करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, ‘आमची योजना होती की…”

“माझे वडील, माझे हिरो”, हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर शेअर केली भावनिक पोस्ट

टीम इंडिया २००३ साली ऑस्ट्रेलियात केलेल्या ‘या’ चमत्काराची करणार का पुनरावृत्ती?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---