---Advertisement---

Ranji Trophy: राहुल-स्मरणच्या शतकी भागीदारीमुळे 42 वेळेचा चॅम्पियन संघ बाहेर, कर्नाटकची सेमीफायनलमध्ये धडक

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 3:31 PM
Sanjay-Manjrekar-On-Kl-Rahul
---Advertisement---

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकने ४२ वेळेचा विजेता मुंबईचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला आहे. कर्नाटकने मुंबईला ४ विकेट्सने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. यामध्ये केएल राहुलने त्याच्या प्रथम श्रेणीतील २४वे शतक केले. तसेच त्याचे हे रणजीतील ९वे शतक ठरले आहे.

या सामन्यात कर्नाटकला विजयासाठी ३२५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्यामध्ये राहुलने १८२ चेंडूत १३० धावांची खेळी केली. तसेच त्याने मंयक अग्रवाल आणि कर्णधार देवदत्त पड्डीकल बाद झाल्यावर संघाचा डाव सांभाळला. त्याने रवीचंद्रण स्मरणसोबत १४७ धावांची भागीदारी केली. स्मरण ८३ धावा काढत नाबाद राहिला.

यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. पहिल्या दोन्ही डावांमध्ये गोलंदांजी उत्तम झाली. मुंबईचा पहिला डाव १२० धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्यामध्ये अखिल हेरवाडकरच्या ६० धावा सर्वोच्च ठरल्या. कर्नाटककडून मुंबईच्या पहिल्या डावात सर्वाधिक विकेट्स विधवत कावेप्पा, प्रसिद्ध कृष्णा आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. मुंबईच्या दोन्ही डावात भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जायसवाल धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याने यामध्ये ५ आणि ३६ अशा धावा काढल्या.

कर्नाटकच्या पहिल्या डावात अग्रवालने सर्वाधिक ९२ धावा केल्या. यामध्ये मुंबईकडून मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे यांनी प्रभावी कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे कर्नाटकचा पहिला डाव १७३ धावसंख्येवरच आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने सांभाळून फलंदाजी केली.

विकेटकीपर- फलंदाज आकाश आनंद ७० धावा, मुशीर खानच्या ४९ धावा आणि तनुष कोटीयनच्या नाबाद ४८ धावांमुळे मुंबईने दुसऱ्या डावात ३७७ धावा केल्या आणि कर्नाटकला ३२५ धावसंख्येचे लक्ष्य दिले. कर्नाटककडून यामध्ये सर्वाधिक विकेट्स शिखर शेट्टीने घेतल्या. त्याने २० षटकात ४५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात उत्तम खेळणारा मंयक कर्नाटकच्या दुसऱ्या डावात ३ धावांवरच बाद झाला. त्यानंतर आलेल्या पड्डीकलने ३९ धावा करत राहुलला चांगली साथ. राहुलने पुढचा डाव स्मरणच्या साथीने सुरू ठेवला आणि कर्नाटकसाठी लक्ष्य सोपे केले.

उपांत्य फेरीत कर्नाटकचा सामना उत्तराखंडविरुद्ध आहे. हा सामना १५-१९ फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---