---Advertisement---

श्रीलंकाच्या विकेटकीपरने चालू सामन्यात संघ सहकाऱ्याला मारली चापट, सेहवागने घेतली फिरकी

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 8:35 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात १४ जानेवारीपासून गॅले स्टेडियमवर पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (१७ जानेवारी) मैदानावर एक मजेदार घटना घडली. श्रीलंका संघाचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेला याने आनंदाच्या भरात आपल्याच संघ सहकाऱ्याला चापट मारली. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत अप्रत्यक्षपणे डिकवेलाचा चिमटा काढला आहे.

झाले असे की, श्रीलंकाचा सलामीवीर लहिरू तिरिमाने याच्या आतिशी शतकामुळे श्रीलंका संघाने दुसऱ्या डावात ३५९ धावा केल्या. परंतु यजमान इंग्लंडला नाममात्र ७४ धावांचे लक्ष्य मिळाले. या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूप वाईट झाली. पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज डॉम सिब्ले २ धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर दुसरा सलामीवीर झॅक क्राउली हादेखील ८ धावांवर पव्हेलियनला परतला. या दोघांनंतर कर्णधार जो रुट धावबाद झाला.

इंग्लंड संघाची ही दयनीय अवस्था पाहून पाहुण्या श्रीलंका संघाचा आनंदात गगनात मावेनासा झाला. दरम्यान श्रीलंकाचा यष्टीरक्षक डिकवेला आनंद साजरा करण्यासाठी आपल्या संघ सहकाऱ्यांजवळ गेला. श्रीलंकाचे खेळाडू एकत्र येऊन एकमेकांशी हात मिळवून जल्लोष साजरा करत होते. डिकवेलाही त्याच्या संघ सहकाऱ्याला हाय-फाय करायला गेला आणि चुकीचे त्याने त्या खेळाडूला चापट लगावली.

या गमतीशीर घटनेचा व्हिडिओ माजी भारतीय क्रिकेटपटू सेहवागने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘तुम्हाला कुणासोबत अशाप्रकारे हाय-फाय करायचा आहे?’. अर्थातच अप्रत्यक्षपणे सेहवागने श्रीलंकाचा यष्टीरक्षक डिकवेलाची फिरकी घेतली आहे.

https://www.instagram.com/p/CKJaD8uhMpc/?utm_source=ig_web_button_share_sheet

इंग्लंडचा विजयासाठी ३६ धावांची गरज

सामन्याविषयी बोलायचे झाले तर, चौथ्या दिवसाखेर इंग्लंड संघ ३ बाद ३८ धावांवर आहे. यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो ११ धावांवर नाबाद खेळत आहे. तर डॅनियल लॉरेन्स नाबाद ७ धावांवर फलंदाजी करत आहे. तत्पुर्वी श्रीलंका संघाने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या २८६ धावांचे आव्हान पूर्ण केले होते आणि दुसऱ्या डावात ७४ धावांची आघाडी मिळवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : पहिल्या सत्रातच भारतीय गोलंदाजांची कमाल, ऑस्ट्रेलियाच्या ४१ षटकात ४ बाद १४९ धावा

शार्दुल ठाकूर म्हणाला, फलंदाजी करताना रवि शास्त्री यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट होती लक्षात

ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, ‘आमची योजना होती की…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---