भारताच्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जवळपास चार वर्षांनंतर परतला. तो सध्या न्यूझीलंड दौऱ्यातील भारताच्या टी२० संघाचा भाग आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात पाच सामन्याची टी२० मालिका खेळली जात असून आतापर्यंत दोन सामने खेळून झाले. या दोन्ही सामन्यात भुवनेश्वरला खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याची गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने दोन सामन्यांत मिळून केवळ एकच विकेट घेतली आणि त्यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट १० च्या वर राहिला. त्याच्या या प्रदर्शनानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी त्याला एक खास सल्ला दिला आहे.
तिसऱ्या टी२० सामन्याआधी मॉर्केल माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी भुवीने आपल्या खेळावर लक्ष नियंत्रित केले पाहिजे. यासाठी त्याने अपेक्षा बाजूला ठेवल्या पाहिजे. याबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूने भुवीच्या उल्लेखनीय आयपीएल कामगिरीचाही उल्लेख केला.
मॉर्केल म्हणाले, “मला त्याच्या पुनरागमनाबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे. त्याने चार वर्षांनंतर पुनरागमन केल्याने त्याच्याकडून अधिक अपेक्षा असणार. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली.”
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तयारी करणे सोपे नसते, विशेषत: जेव्हा त्या खेळाडूला मालिकेआधी सरावासाठी मर्यादित वेळ मिळतो. यासाठी पहिली गोष्ट म्हणजे, अपेक्षांच्या दबावावर मात करणे हे मोठे आव्हान असते. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याला सरावासाठी खूपच कमी कालावधी मिळाला. त्याच्याकडे सर्व कौशल्ये आणि अनुभव आहे, मात्र त्याला काही सामन्यांमध्ये सिद्ध करण्यासाठी संधी दिली पाहिजे. त्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे मॉर्केल म्हणाले.
“त्याच्यासाठी सुरूवातीपासूनच हाच संदेश होता की, त्याने कशाचाही पाठलाग करू नये. अपेक्षा आहेत, पण प्रत्येक सामन्यागणिक तुम्ही अधिक चांगले व्हाल, तुम्हाला लय सापडेल आणि तुमचा खेळ सुधारेल. त्यामुळे त्याने कोणत्याही बाहेरच्या आवाजांचा (टीकांचा) विचार नाही केला पाहिजे,” असे पुढे मॉर्केल म्हणाले.
३६ वर्षीय भुवीने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या टी२० सामन्यात ४ षटके टाकताना एकही विकेट न घेता ४९ धावा दिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ४ षटकांत ५० धावा देत एक विकेट घेतली. (99 runs conceded in 2 T20I matches vs NZ message from Morne Morkel for Bhuvneshwar Kumar; says, “Don’t chase anything…”)






