---Advertisement---

ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2024 6:16 PM
---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ॲडलेड येथे होणारा हा दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियानं पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला होता.

या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माचं भारतीय संघात पुनरागमन झालं असून शुबमन गिलही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अशा परिस्थितीत पर्थ कसोटीत खेळलेले देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणं निश्चित आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणारा दिवस-रात्र कसोटी सामना भारतात किती वाजता सुरू होईल? तुम्ही त्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? हे सर्व आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. दुसरा कसोटी सामना ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.

या सामन्याचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर उपलब्ध असेल. तसेच मोबाईलवर तुम्ही हा सामना ‘हॉटस्टार’वर लाईव्ह पाहू शकता. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता, म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरू होईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता होईल.

ॲडलेड कसोटीचं पहिलं सत्र भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 ते 11.30 वाजेपर्यंत खेळलं जाईल. यानंतर जेवणाचा ब्रेक असेल. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 12 वाजता दोन्ही संघ दुसऱ्या सत्रासाठी आमने-सामने येतील. दुसरं सत्र दुपारी 12.10 ते 2:10 वाजेपर्यंत खेळलं जाईल. त्यानंतर 20 मिनिटांचा चहापानाच ब्रेक होईल. शेवटच्या सत्राचा खेळ दुपारी 2:30 वाजता सुरू होईल आणि 4:30 वाजता खेळ संपेल. सामन्यादरम्यान पाऊस पडला किंवा इतर कारणांमुळे सामना थांबवावा लागला, तर अशा परिस्थितीत सत्राच्या वेळेत बदल होऊ शकतो.

हेही वाचा – 

चॅम्पियन्स ट्रॉफीचा मार्ग मोकळा, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!
जसप्रीत बुमराह ॲडलेडमध्ये इतिहास रचणार! फक्त 3 विकेट घेताच मोडेल झहीर खानचा विक्रम
ऑस्ट्रेलियानं धूळ चारली, पहिल्या वनडेत भारतीय संघाचा दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---