---Advertisement---

भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 5:17 PM
---Advertisement---

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला जात आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जात असलेल्या या दिवस-रात्र कसोटीचा आज (6 डिसेंबर) पहिला दिवस होता. पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 94 धावांची आघाडी आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ पहिल्या डावात 180 धावा करून ऑलआऊट झाला. प्रत्तुत्तरात, ऑस्ट्रेलियानं 1 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. पर्थ कसोटीतील शतकवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मिचेल स्टार्कनं त्यानं शून्यावर तंबूत धाडलं. यानंतर केएल राहुल (37) आणि शुबमन गिल (31) यांनी डाव सांभाळला.

राहुल बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला. स्टार फलंदाज विराट कोहली काही कमाल करू शकला नाही. तो केवळ 7 धावा करू शकला. यष्टीरक्षक रिषभ पंत 21 तर कर्णधार रोहित शर्मा 3 धावा करून आऊट झाले. अखेरच्या षटकांमध्ये नितीश रेड्डीनं फटकेबाजी केली. त्यानं 54 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 42 धावा केल्या. अश्विननं 22 धावांचं योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियासाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं जोरदार गोलंदाजी केली. स्टार्कनं 48 धावा देत 6 विकेट घेतल्या. कमिन्स आणि बोलँडनं 2-2 विकेट मिळवल्या.

आपल्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर उस्मान ख्वाजा फक्त 13 धावा करू शकला. त्याला बुमराहनं बाद केलं. यानंतर मॅकस्विनी (38*) आणि मार्नस लाबुशेन (20*) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. हे दोघे दिवसअखेर नाबाद राहिले. या दोघांमध्ये 62 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.

हेही वाचा – 

बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
नितीश रेड्डीला तोड नाही, चक्क रिव्हर्स स्कूप शॉटवर हाणला षटकार! VIDEO एकदा पाहाच
स्टार गोलंदाजाची दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी, या यादीत तिसऱ्या स्थानी झेप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---