ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी 90 धावा आणि राहुल 62 धावा करून नाबाद आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्याच मैदानावर सळो की पळो करून टाकलं.
टीम इंडियानं दुसऱ्या डावात बिनबाद 172 धावा केल्या आहेत. भारतानं पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 104 धावांत आटोपला होता. दुसऱ्या डावात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल भारतासाठी सलामीला आले. राहुलनं 153 चेंडूंचा सामना करत नाबाद 62 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 4 चौकार मारले. यशस्वीनं 193 चेंडूंचा सामना करत नाबाद 90 धावा केल्या. तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मिचेल स्टार्कनं सर्वाधिक 26 धावा केल्या. कांगारुंचा संपूर्ण संघ 104 धावांवर गडगडला. सलामीवीर उस्मान ख्वाजा 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅकस्वीन 10 धावा करून बाद झाला. लाबुशेननं फक्त 2 धावा गेल्या. तर स्टीव्ह स्मिथला खातंही उघडता आलं नाही. ट्रॅव्हिस हेड 11 धावा करून बाद झाला. मिचेल मार्श 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतासाठी जसप्रीत बुमराहनं घातक गोलंदाजी केली. त्यानं एकूण 5 विकेट घेतल्या. बुमराहनं 18 षटकात 30 धावा दिल्या आणि 6 षटकं मेडन टाकली. पदार्पण करणाऱ्या हर्षित राणानं 3 बळी घेतले. त्यानं 15.2 षटकात 48 धावा दिल्या. मोहम्मद सिराजनं 2 बळी घेतले. त्यानं 13 षटकात 20 धावा दिल्या. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही विकेट मिळाली नाही.
हेही वाचा –
“तू मुलगी का झालास?”, चाहत्याच्या प्रश्नाला आर्यन बांगरचं थेट उत्तर; म्हणाला…
IND vs AUS: पर्थमध्ये टीम इंडियाने 1948 नंतर पहिल्यांदाच केला असा पराक्रम
IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरची अप्रतिम कामगिरी, या स्पर्धेत झळकावले शानदार शतक