भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पर्थ कसोटीचा तिसरा दिवस भारताच्या नावे राहिला. आता टीम इंडिया या सामन्यात खूप पुढे गेली आहे. प्रथम यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीनं शतक झळकावलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजीत धुमाकूळ घातला. या दोघांनी अवघ्या 4.2 षटकांत ऑस्ट्रेलियाने 3 गडी बाद केले. आता टीम इंडिया विजयापासून फक्त 7 विकेट दूर आहे.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाच्या फलंदाजीनं झाली. भारतीय संघानं तिसऱ्या दिवसाची सुरुवात 172/0 धावांनी केली. यावेळी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल क्रीजवर होते. जयस्वालनं 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं शानदार 161 धावा ठोकल्या. त्याला केएल राहुलनं उत्तम साथ दिली. राहुलनं 5 चौकारांच्या मदतीनं 77 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली.
जयस्वाल आणि राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियानं काही विकेट झटपट गमावल्या. यानंतर विराट कोहलीनं जबाबदारी स्वीकारली. त्यानं 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 100 धावा केल्या. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 81वं शतक आहे. कोहलीला नितीशकुमार रेड्डीनं शेवटपर्यंत साथ दिली. रेड्डीनं 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 38 धावा ठोकल्या.
विराट कोहलीचं शतक पूर्ण केल्यानंतर टीम इंडियानं 487/6 धावांवर डाव घोषित केला. डाव घोषित होताच भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसअखेर 3 विकेट्स गमावल्या. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4.2 षटकांत 12/3 अशी आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 2 आणि मोहम्मद सिराजनं 1 बळी घेतला. बुमराहनं नॅथन मॅकस्विनी आणि मार्नस लाबुशेन यांना आपला शिकार बनवलं. तर सिराजनं पॅट कमिन्सला बाद केलं.
हेही वाचा –
विराट कोहलीचे शानदार शतक, सचिन तेंडूलकरचा महान विक्रम मोडीत, ऑस्ट्रेलिया भुईसपाट..!
विराट कोहलीचा जबरदस्त षटकार! सुरक्षा रक्षकाला लागला चेंडू; व्हायरल VIDEO पाहा
IPL 2025 mega auction; या 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश