---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कॅप्टन रोहितची दहशत! केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम नावावर

On: शनिवार, सप्टेंबर 24, 2022 2:14 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात दुसरा टी20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपूर येथे खेळला गेला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने सामन्याला तब्बल अडीच तास उशिर झाला. यामुळे हा सामना प्रत्येकी 8-8 षटकांचा खेळला गेला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मॅचविनिंग खेळी केली आहे. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय टी20मधील ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावत 90 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केएल राहुल (10) आणि विराट कोहली (11) यांची विकेट लवकर गमावली, तर सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाला. हार्दिक पंड्याही 9 धावा करत बाद झाला. भारताच्या एका बाजूने विकेट पडत असताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एक बाजू चांगली लढवली.

रोहितने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. त्याला दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने योग्य साथ दिली. रोहितने त्याच्या या छोट्या आणि अतिमहत्वाच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. याबरोबरच त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये त्याने 500 पेक्षा अधिक चेंडू सीमारेषेपार टोलवले आहेत. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये आतापर्यंत 504 चेंडू सीमारेषेपार पाठवले आहेत. यामध्ये 328 चौकार आणि 176 षटकारांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक चेंडू सीमारेषेपार पाठवण्याच्या यादीत न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 479 चेंडू सीमारेषेपार पाठवले आहेत. यामध्ये 307 चौकार आणि 172 षटकारांचा समावेश आहे. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 344 चौकार आणि 112 षटकार असे एकूण 456 चेंडू सीमारेषेपार पाठवले आहेत. त्याचबरोबर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली 321 चौकार आणि 104 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक चेंडू सीमारेषेपार (चौकार-षटकार) पाठवणारे खेळाडू:
504 – रोहित शर्मा
479 – मार्टिन गप्टिल
456 – पॉल स्टर्लिंग
425 – विराट कोहली
412 – ऍरॉन फिंच

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताने सामना जिंकला असला तरी ‘या’ खेळाडूच्या नावावर नकोसा विक्रम; हार्दिक, चहलचाही समावेश
INDvAUS: रोहितचा पहिलाच षटकार ठरला विक्रमी! आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय
ज्युनियर तेंडुलकर झाला 23 वर्षांचा; जाणून घ्या बर्थ डे बॉयच्या आयुष्यातील मजेशीर किस्से

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---