---Advertisement---

WTC फायनलचा पराभव विराटच्या जिव्हारी, एक शब्दही न बोलण्याचा घेतला निर्णय; स्टोरी पाहून व्हाल भावूक

Virat-Kohli
---Advertisement---

रविवारी (दि. 11 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य संघ आमने-सामने होते. मात्र, ऑस्ट्रेलिया संघ भारतावर भारी पडला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात ऑस्ट्रेलिया वरचढ ठरली आणि भारताला पराभवाच्या खाईत ढकलून दिले. या पराभवानंतर भारतीय संघ खूपच निराश झाला. कर्णधार रोहित शर्मा याच्यापासून ते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यापर्यंत सर्वजण निराश दिसले. तसेच, विराट कोहली इंस्टाग्राम स्टोरी टाकून व्यक्त झाला. त्याने यामधून आपले दु:ख व्यक्त केले.

विराटने इंस्टाग्रामवर शेअर केला भावूक संदेश
तब्बल 10 वर्षांनंतर विराटसह भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.मात्र, सामन्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) स्वत:च्या आणि संघाच्या प्रदर्शनावर अजिबात खुश दिसला नाही. सामना संपल्यानंतर दु:ख व्यक्त करण्यासाठी विराट कोहली इंस्टाग्राम स्टोरीचा (Virat Kohli Instagram Story) आधार घेताना दिसला. त्याने स्टोरीमध्ये लिहिले की, “मौन राहणे हे महान शक्तीचा स्त्रोत आहे.” याचा अर्थ कदाचित त्याने सध्या तरी पराभवावर कोणतीच प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Virat-Kohli-Instagram-Story
Photo Courtesy: Instagram/virat.kohli

रोहितने केलं विराटचं कौतुक
सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली याचे गुणगान गाताना दिसला. तो म्हणाला की, “विराट कोहली एक लीडर आहे. तो नेहमी माझी मदत करतो. तो कसोटी क्रिकेटचा एक महान कर्णधार आहे, मी विराट कोहलीच्या 1 टक्केही नाहीये.” सध्या भारतीय संघाच्या पराभवानंतर सर्व बाजूंनी खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे.

भारताचा दारुण पराभव
भारतीय संघापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 234 या निराशाजनक धावसंख्येवर संपुष्टात आला. कर्णधार रोहित शर्मा याने 60 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. तसेच, अजिंक्य रहाणे याने 46 धावा केल्या. विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने 4 विकेट्स चटकावल्या. (ind vs aus cricketer virat kohli insta story after losing wtc 2023 final)

महत्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांवर कडाडले सुनील गावसकर; म्हणाले, ‘मोठ्या खेळीविषयी बोलणाऱ्या विराटला प्रश्न विचारा…’
‘ऑलिम्पिकमध्येही गोल्ड जिंकण्यासाठी फक्त एकच शर्यत असते’, रोहितच्या ‘त्या’ विधानावर कमिन्सचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---