भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली खेळली जात आहे. यापैकी दोन सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यात डेविड वॉर्नर भाग घेवू शकला नव्हता. त्याचा फटका ऑस्ट्रेलिया संघाला सहन करावा लागला होता. त्यातच स्टीव्ह स्मिथ देखील त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. पण आता 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतून वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करु शकतो. या सामन्याआधी स्मिथ आणि वॉर्नरला काय रणनिती अंमलात आणावी लागेल, याबद्दल प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले आहे.
जस्टीन लँगर म्हणाले, “डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ मागील वर्षात जास्त प्रमाणात कसोटी क्रिकेट खेळले नाहीत. परंतु आशा आहे की, तिसर्या कसोटी सामन्यात त्या दोघांनी खेळपट्टीवर वेळ घालवावा. डेविड वॉर्नर आणि स्मिथने मर्यादित षटकांचे खूप सामने खेळले आहेत. त्यांनी मागील 12 महिन्यात पाच दिवसीय सामने खेळले नाहीत. वॉर्नर आपल्या दुखापतीबद्दल अजून काही बोलत नाही, हे असे काहीसे आहे की, ज्यावर आम्ही बोललो आहे. तो खेळातील मास्टर आहे. त्याने खूप प्रमाणात क्रिकेट खेळले आहे आणि त्याचा अनुभव कामी येईल. ”
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, “स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरला सूर गवसण्यासाठी धावपट्टीवर खूप वेळ घालवण्याची गरज आहे. स्टीव्ह स्मिथला नेहमी सरावाचा फायदा मिळतो. मेलबर्न येथे झालेल्या पावसामुळे आमचे थोडे नुकसान झाले. दुर्दैवाने आम्हाला बाहेर पडता आले नाही. स्टीव्ह स्मिथ बर्याच चेंडूला हिट करत आहे. त्याने यासाठी भरपूर काही केले आहे. डेविड वॉर्नरने सुद्धा धावपट्टीवर खूप वेळ घालवला नाही. त्याला ही धावपट्टीवर वेळ घालण्याची गरज आहे. ”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍडलेडमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर मेलबर्न येथे खेळला गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघाने बरोबरी केली आहे. त्यामुळे सिडनीत 7 जानेवारी पासून खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो मालिकेत आघाडी घेईल. तसेच मालिका आपल्या नावावर करण्याची संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“या क्षणाची वाट पाहण्यात माझे केस पांढरे झाले”, सचिनच्या शंभराव्या शतकाविषयी रैनाचा खुलासा
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ गोलंदाज करणार पदार्पण
अजिंक्य रहाणेसाठी डोकेदुखी, शार्दुल आणि सैनीपैकी कोणाची करावी निवड?