---Advertisement---

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत

On: बुधवार, डिसेंबर 9, 2020 12:17 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय ए संघ ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ११ डिसेंबरपासून तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मात्र, कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. स्वत: विराटनेच याबद्दल माहिती दिली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेला तिसरा टी२० सामना संपल्यानंतर विराट म्हणाला, “मी उद्या सकाळी उठल्यानंतरच ठरवेल की सामना खेळायचा की नाही. मला पूर्ण सामन्यात जोशाने खेळायला आवडते. मी उद्या सकाळी उठल्यानंतर फिजियोला भेटेल व त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जायील.”

कसोटी मालिकेबद्दल बोलताना विराट म्हणाला, “आम्हाला येथे खेळण्याचा अनुभव आहे. फलंदाजांना येथे धावा कशा कराव्यात याचा अनुभव आहे. प्रत्येक सत्रात उत्तम कामगिरी करण्याकडे आमचे लक्ष असेल.”

तिसऱ्या टी२० सामन्यात झालेल्या पराभवाबद्दल बोलताना विराट म्हणाला, “जेव्हा हार्दिकने काही आक्रमक फटके मारले, तेव्हा आम्हाला विश्वास होता की आम्ही हा सामना जिंकू. मधल्या षटकांत आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही, तिथे जर आम्ही चांगली भागीदारी केली असती, तर सामना जिंकणे सोपे ठरले असते”.

वनडे व टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ १७ डिसेंबरपासून बहुप्रतिक्षित ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका खेळणार आहे. २०१८- १९ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताने इतिहास घडवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात २-१ ने मालिका विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली पालकत्व रजा घेऊन आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शार्दुलचा राग अनावर! आक्रमक फलंदाज मॅक्सवेलचा झेल सोडताच केला अपशब्दांचा वापर, पाहा Video

‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर

धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…

ट्रेंडिंग लेख-

अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज

टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---