भारत मंगळवारपासून (20 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका तीन सामन्यांची असून पहिला सामना मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार असून उपकर्णधार केएल राहुल आहे. त्याला टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात जागा दिल्याने एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली होती.
केएल राहुल (KL Rahul) भारताचा सलामीवीर आणि उपकर्णधार, मात्र त्याने यावर्षी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याला टी20 विश्वचषक आणि महत्वाच्या दोन्ही मालिकांमध्ये घेतल्याने क्रिकेटविश्वात चाहत्यांनी खळबळ माजवली आहे. यावर्षी तो आशिया चषकाआधी एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही. तर त्याने 2022मध्ये आतापर्यंत 5 सामने आंतरराष्ट्रीय टी20 खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याआधी राहुल म्हणाला, “कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. प्रत्येकजण त्याच्यानुसार काम करत असतो. स्ट्राईक रेट संपूर्ण कामगिरीवर आधारित असतो. आपल्याला माहितच आहे की कोणताही फलंदाज निश्चित केलेल्या स्ट्राईक रेटनुसार खेळत नाही, तो नेहमी बदलत असतो. एखाद्या फलंदाजांला त्याच्यासाठी 200च्या स्ट्राईक रेटने खेळणे आवश्यक असते, मात्र संघ त्याच्या 120-130 स्ट्राईक रेटनेही जिंकू शकतो.”
राहुल पुढे म्हणाला, “मागील 10-12 महिन्यांपासून खेळाडूंना जी जबाबदारी दिली आहे, ती ते पार पाडत असून त्यानुसार कामगिरी करत आहेत. मी सलामीवीर म्हणून स्वत:मध्ये अजून किती बदल आणू शकतो, याचा प्रयत्न करत आहे. यावेळी मी फलंदाजीचा सराव करताना संघासाठी कशी कामगिरी करावी याचादेखील विचार करत आहे.”
राहुल दुखापतीनंतर राष्ट्रीय संघात परतला. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याने आशिया चषक 2022च्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शून्यावर विकेट गमावली होती, तर भारताच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध 62 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिक इन, पंत आऊट! दिग्गजाने निवडलीये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया, वाचा ओपनर कोण ते
टीम इंडियाविरूद्ध ‘बिग शो’ मॅक्सवेलची स्पेशल तयारी; पाहा व्हिडिओ
भारतीय युवा बॉक्सिर्सनी सर्बियातील गोल्डन ग्लोव्ह ऑफ व्होजवोडिना स्पर्धेत जिंकली 19 पदके






