भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी 06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सलामीला खेळले होते. ज्यामध्ये रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.
आता रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून तो ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. रोहित शर्मा कर्णधार असण्यासोबतच सलामीवीर देखील आहे. अशा परिस्थितीत आता केएल राहुलऐवजी रोहित शर्मा यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंग करताना दिसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जयस्वाल आणि राहुल यांनी पर्थ कसोटीत सलामीला शानदार फलंदाजी केली. ज्यामध्ये दुसऱ्या डावात त्यांनी विक्रमी भागिदारी केली होती.
आता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत केएल राहुलला त्याच्या फलंदाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. राहुलला विचारण्यात आले की, ॲडलेड कसोटीत तु कोणत्या स्थानावर फलंदाजी करशील. हे तुला सांगण्यात आले आहे का? या प्रश्नावर त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले. फलंदाजीच्या स्थितीवर प्रतिक्रिया देताना राहुल म्हणाला, “मला सांगण्यात आले आहे, परंतु मला आज तुमच्याशी शेअर करू नका असे देखील सांगण्यात आले आहे. तुम्हाला एकतर पहिल्या दिवसाची वाट पहावी लागेल किंवा कदाचित कर्णधार (रोहित शर्मा) उद्या स्पष्ट करेल.”
KL Rahul said – “Yeah, I have been told about my batting position but I have also been told not to share it with you (smiles)”. pic.twitter.com/2tn27luvuY
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 4, 2024
ॲडलेडमध्ये पिंक बॉल डे-नाईट टेस्ट खेळवली जाणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियाने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी बॉल सराव सामना खेळला. ज्यामध्ये यशस्वी जयस्वालसह केएल राहुल सलामीला दिसले होते. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
हेही वाचा-
’10 वर्षे झाली मी एमएस धोनीशी बोलत नाही….’ माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
ॲडलेड ‘कोहली-कोहली’च्या घोषणांनी दणाणले, ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांची हवा
‘लोकांनी पृथ्वी शॉची सचिनशी तुलना करून चूक केली, त्यानी आता विराट कोहलीकडून प्रेरणा घ्यावी’