भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या दोन फलंदाजांनी शतक, तर दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीला आल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा याने सुरुवातीच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या, त्यादेखील लागोपाठ चेंडूंवर.
प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) मागच्या काही वर्षी दुखापतीचा सामना करत राहिला. यावर्षी ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. पुन्हामनानंतर चौथा सामना त्याने रविवारी (24 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा याने आपल्या पहिल्याच षटकात दोन महत्वाच्या विकेट्स मिलवल्या.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या कृष्णाने दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short), आणि तिसऱ्या चेंडूवर वरच्या फळीतील दिग्गज स्टीव स्मिथ (Steven Smith) यांनी तंबूचा रस्ता दाखवला. या षटकात कृष्णा याने अवघी एक धाव खर्च केली. संघाची धावसंख्या 9 असताना ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज तंबूत परतले. शॉर्टने संघासाठी 9 धावांचे योगदान दिले. पण स्मिथ गोल्डन डक (पहिल्या चेंडूवर शुन्य धावा करून) झाला. प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात संघासाठी महत्वाच्या विकेट्स घेऊ शकला, पण वनडे विश्वचषकात त्याची कमाल पाहायला मिळणार नाही. कारण विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात कृष्णाला संधी दिली गेली नाहीये.
Two in Two for @prasidh43 ????????
Matthew Short (9) and Steve Smith (0) depart in quick succession.
Live – https://t.co/XiqGsyElAr… #INDvAUS@IDFCFIRSTBank pic.twitter.com/yHWRX9mZsJ
— BCCI (@BCCI) September 24, 2023
तत्पूर्वी भारतीय संघाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 399 धावा केल्या होत्या. शुमबन गिल याने 104, तर श्रेयस अय्यर याने 105 धावांची सर्वोत्तम खेळी केली. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल याने 52, तर सहाव्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादव याने 72* धावांची वादळी खेळी केली. (IND vs AUS Prasidh Krishna took two important wickets of Australia in two balls)
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । कर्णधाराचा आऊट ऑफ पार्क सिक्स! टायमिंग पाहून व्हाल थक्क
व्हिडिओ गेम! सूर्यकुमारपुढे कॅमरून ग्रीनने टेकले गुडघे, पाहा भारतीय फलंदाजाचे सलग चार षटकार