---Advertisement---

“हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील कर्णधार, मात्र सध्या संघात जागा नाही”, शेन वॉर्न यांची प्रतिक्रिया

On: मंगळवार, जानेवारी 5, 2021 9:26 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे .मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या कसोटी सामन्याचे महत्व अधिकच वाढले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले.

पहिल्या सामन्यात विजय मिळवूनही दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा झालेला पराभव हा अनेक क्रिकेट पंडितांना पचनी पडलेला नाही. ऑस्ट्रेलिया संघाबद्दल अनेक क्रिकेटरसिक नाराजीचा सूर उमटवत आहेत. विशेषतः ऑस्ट्रेलियन फलंदाजी पूर्ण मालिकेदरम्यान अपयशी ठरलेली आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनी ट्रॅविस हेडच्या संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र याच वेळी वॉर्न यांनी ट्रॅविस हेडला भविष्यातील कर्णधार देखील संबोधले आहे.

एका न्यूज चॅनेलला दिलेल्या इंटरव्यू दरम्यान वॉर्न म्हणाले, “आम्ही सर्व लोक जाणतो की ट्रायवस हेड हा एक उत्तम खेळाडू असून, भविष्यातील कर्णधार देखील आहे. मात्र यासाठी ट्रॅविसला संघात आपले स्थान पक्के करावे लागेल. मी सध्या त्याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देणार नाही. त्याच्या खेळात काही उणिवा असून त्या दूर करणे गरजेचे आहे.”

भारताविरुद्ध खेळलेल्या या मालिकेत हेडला विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने खेळलेल्या तीन डावांत अनुक्रमे 7 ,38 आणि 17 धावा केलेल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर चे संघात पुनरागमन होणार असून हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की हेड आपले संघातील स्थान टिकवण्यात यशस्वी होतो अथवा नाही.

महत्वाच्या बातम्या:

पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका

SA vs SL : सांघिक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, मी स्टीव्ह स्मिथला कोचिंग करत नाही, कारण..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---