भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवारी (27 सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा स्टीव स्मिथ याने या सामन्यातील आपल्या खेळीदरम्यान, खास विक्रम नावावर केला.
स्टीव स्मिथ (Steve Smith) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 43 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने आपल्या 5000 वनडे धावाही पूर्ण केल्या. वनडे कारकिर्दीतील आपल्या 129व्या डावात स्मिथने 5000 धावांचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात कमी डावांमध्ये 5000 वनडे धावा करणाऱ्यांच्या यादीत स्मिथला चौथा क्रमांक मिळाला आहे. या खास यादीत पहिल्या क्रमांकावर त्यांचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आहे. माजी कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) आणि डीन जॉन्स (Dean Jones) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
सर्वात कमी डावांमध्ये 5000 वनडे धावा करणार ऑस्ट्रेलियन खेळाडू
डेव्हिड वॉर्मर – 115 डाव
ऍरॉन फिंच – 126 डाव
डीन जॉन्स – 128 डाव
स्टीव स्मिथ – 129 डाव*
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात डेव्हिड वॉर्मर आणि मिचेल मार्श यांनी चांगल्या पद्धथीने केले. सलामीवीर फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 49 चेंडूत 78 धावांची महत्वपूर्ण भागीदारी पार पडली. वॉर्नरने 34 चेंडूत56 धावा केल्यानंतर विकेट गमावली. (Steve Smith becomes the fourth-quickest Australian to 5,000 ODI runs)
तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
कृष्णा जोमात, वॉर्नर कोमात! सलग तिसरे अर्धशतक ठोकणाऱ्या स्टार फलंदाजाचा प्रसिद्धने केला खेळ खल्लास
अब आयेगा मजा! तिसऱ्या वनडेत कमिन्स ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांच्या ‘या’ स्टार खेळाडूंचे पुनरागमन