---Advertisement---

ऍडलेड ठरले विराट कोहलीसाठी लकी

On: मंगळवार, जानेवारी 15, 2019 5:28 PM
---Advertisement---

ऍडलेड। भारताचा आज (15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना ओव्हलवर झाला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक केले आहे.

ऍडलेड हे कोहलीसाठी लकी ठरले आहे. त्याने येथे खेळताना कसोटीमध्ये 3 आणि वन-डे मध्ये 2 शतके केली आहेत. त्याने ऍडलेडवर आत्तापर्यंत 3 कसोटी आणि 4 वनडे सामने खेळले आहेत.

आजचे शतक कोहलीने 108 चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 39 वे तर एकूण 64 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. याबरोबरच विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत कुमार संगकाराच्या 63 शतकांना मागे टाकले आहे.

विराटने आज या सामन्यात रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची, अंबाती रायडूबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची आणि एमएस धोनीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात विराट सचिनला सरस

एमएस धोनी इज बॅक!

९ भारतीय कर्णधारांना जे जमले नाही किंग कोहलीने कांगारूच्या भूमीत करून दाखवले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment