भारता विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली होती. कारण भारतीय संघाने दुसर्या डावात लाजिरवाणी फलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा भारतीय संघ दुसर्या कसोटी सामन्यासाठी तयार आहे. परंतु भारतीय संघाच्या फलंदाजांवर टीका केली जात आहे. क्रिकेट तज्ज्ञ भारतीय संघाला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत. यामध्ये माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण सुद्धा सहभागी झाला आहे. त्याने भारतीय संघाला प्रोत्साहन देताना एक सल्ला दिला आहे.
मागील पराभवाला विसरू नये
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, भारतीय संघाने मागील पराभवातून पुढे जाताना एक नवीन सुरुवात करायला पाहिजे. तो म्हणाला, “एका सामन्यात खराब कामगिरी केली म्हणून भारतीय संघ खराब ठरत नाही.” तो पुढे म्हणाला, “भारतीय संघाने मागील पराभव विसरू नये. कारण यामधून चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आता त्यांनी पुढील सामन्यांसाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ही भारतीय संघाची परीक्षा असणार आहे.”
मेलबर्न सामन्यात नव्याने करावी सुरुवात
व्हीव्हीएस लक्ष्मण इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये म्हणाला, “संघाच्या कामगिरीबद्दल नवीन काही सांगणार नाही, कारण अगोदरच खूप लोकांनी यावर मते मांडली आहेत. आपल्याला हे विसरून चालणार नाही की, जे प्रदर्शन केले होते ते निराश करणारे होते. आता वेळेची हीच मागणी आहे की ऍडलेडचा सामना मागे सोडून, मेलबर्न सामन्यात नव्याने सुरुवात करावी.”
कसोटी इतिहासातील ठरली सर्वात कमी धावसंख्या
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात 36 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या भारतीय संघाच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या ठरली होती. यानंतर आता भारतीय संघ दुसर्या सामन्यात नव्या कर्णधारासह नव्या रणनितीने मैदानावर उतरेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात भारतीय संघात प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला जाणार आहे. या सामन्यात केएल राहुल, रिषभ पंत आणि शुबमन गिल यांना संधी मिळू शकते.
विराट कोहली आणि मोहमद शम्मी मालिकेतून बाहेर
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यातनंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो उर्वरीत सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार नाही. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
त्याचबरोबर मोहमद शमीला दुसर्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाल्याने तो ही या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार आहे, हे अजून स्पष्ट झाले नाही
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! पुढील ६ महिन्यांसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज संघातून बाहेर
‘कृपा कर आणि आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे’, चाहत्यांची जोरदार मागणी
मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख
ट्रेंडिंग लेख-
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर