बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 404 धावसंख्येवर संपुष्टात आला. यामध्ये भारताकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्याचबरोबर रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांनीही 40 पेक्षा अधिक धावा करत महत्वपूर्ण भुमिका पार पाडली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पहिल्या दिवशी भारताने कर्णधार केएल राहुल, शुबमन गिल हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले होते. ते काही कमी असताना विराट कोहली देखील एक धाव करताच तैजुल इस्लाम याचा शिकार ठरला. यामुळे भारताचा पहिला डाव 200चा आकडा तरी पार करेल का अशी चिंता होती. त्याच क्षणी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत जोडीने भारताचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. पंत 46 धावा करत बाद झाला. त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि दोन षटकार ठोकले.
त्यानंतर पुजारा-अय्यर जोडीने पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पुजारा 90 धावा करत बाद झाला. त्याने ही खेळी 203 चेंडूत 11 चौकार मारत केली. अय्यरही 86 धावा करत तंबूत परतला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या आर अश्विन (R Ashwin) याने कुलदीप यादव याच्या साथीने 87 धावांची भागीदारी केली आणि भारताने 350चा टप्पा गाठला. अश्विन 58 धावा आणि कुलदीप 40 धावा करत बाद झाले.
चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्याचा हा गुरूवार (15 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. यावेळी उमेश यादव हा दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने छोटी पण झटपट खेळी केली त्यामुळे भारताने 400चा आकडा गाठला. त्याने 10 चेंडूत 2 षटकार मारत नाबाद 15 धावा केल्या.
https://twitter.com/BCCI/status/1603291412921200640?s=20&t=XtzjA7rSvXUqWubl1MYbeg
बांगलादेशकडून इस्लाम आणि मेहेदी हसन मिराज यांनी गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली. दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. इस्लामने गिल, पुजारा, कोहली आणि कुलदीप यांना बाद केले. तसेच मिराजने पंत, अक्षर, अश्विन आणि सिराज याच्या विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा पहिला डाव सुरू झाला असता सिराजने पहिल्याच चेंडूवर नजमुल शांतो याला बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्पिनर्सविरोधात विराट गरजेपेक्षा जास्त सावध भूमिका घेतो? वसीम जाफरने दिले उत्तर
आठव्या क्रमांकावर अश्विनचाच जलवा! बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ठोकले अर्धशतक






