तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारताला पहिल्या दोन सामन्यात पराभूत केले. भारताच्या या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी केएल राहुल याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहित शर्मा याने अंगठ्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडताच राहुलने संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र, तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही.
बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना विजयाचे श्रेय देत माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याचा असा विश्वास आहे की, भारताकडे एका अनुभवी कर्णधाराची कमी होती. केएल राहुल (KL Rahul) याच्याकडे इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धेचा भरपूर अनुभव आहे. मात्र, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विषय निघतो, तेव्हा 30 वर्षीय खेळाडूला फारशी संधी मिळाली नाही.
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांच्या रुपात आपल्याकडे चांगले गोलंदाज होते. उमरान मलिकनेही चांगले प्रदर्शन केले. मात्र, बांगलादेशकडे सर्व प्रश्नांची उत्तरे होती. त्यांनी शानदार फलंदाजी केली आणि स्ट्राईक चांगल्याप्रकारे बदलली. जेव्हा तुमचा कर्णधार मैदानावर नसेल, तेव्हा हे कठीण असते. तसेच, यष्टीरक्षकाला कर्णधारपद सांभाळावे लागेल. केएल राहुल खूप अनुभवी कर्णधार नाहीये. खासकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर. याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, हे कोणतेही कारण होऊ शकत नाही. तुम्हाला बांगलादेशला श्रेय द्यावे लागेल.”
तिसऱ्या वनडेतून रोहित, दीपक आणि कुलदीप बाहेर
दुसऱ्या वनडेत शानदार कामगिरी करूनही रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. कारण, मागील सामन्यात त्याला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कदाचित कसोटी मालिकेतही खेळू शकणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, रोहित बाहेर पडल्यामुळे अभिमन्यू ईश्वरन याला कसोटीत स्थान मिळू शकते. भारत अ संघाकडून खेळताना अभिमन्यू बांगलादेश अ संघाविरुद्ध दमदार प्रदर्शन करत आहे.
गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे आधीच त्यांच्या दुखापतीच्या कारणांमुळे बाहेर झाले होते. तसेच, आता दीपक चाहर आणि कुलदीप सेन हेदेखील दुखापतग्रस्त झाले. कुलदीप यादव याला बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडे सामन्यासाठी भारतीय संघात सामील करण्यासोबतच अशी शक्यता आहे की, त्याला चट्टोग्राम सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्येही सामील केले जाऊ शकते. (ind vs ban former cricketer wasim jaffer questions kl rahul captaincy read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला आयपीएलमधूनही उघडणार कुबेराचा खजाना! मिडीया राईट्ससाठी बीसीसीआयने केले टेंडर जारी
पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर कडाडून टीका; म्हणाला, ‘आयपीएलचा विचार सोडा, देशाचा विचार करा’