सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 मध्ये बांग्लादेशचा दारुण पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. तिसऱ्या टी20 मध्ये भारताच्या विजयाचा नायक संजू सॅमसन ठरला. ज्याने आपल्या टी20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. ज्यामध्ये त्याने 111 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान भारताने टी20 क्रिकेटमध्ये आपली सर्वोत्तम धावसंख्याही केली. सूर्यासोबत संजूने बांग्लादेशी गोलंदाजांना ठेचून काढले. संघाने निर्धारित 20 षटकात 297 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाला 7 गडी गमावून 164 धावाच करता आल्या. भारताने हा सामना 133 धावांच्या फरकाने जिंकला. चला जाणून घेऊया शेवटच्या सामन्यात सामनावीर कोण ठरला आणि कोणाला मालिकावीर ट्रॉफी मिळाली-
पहिल्या दोन टी-20मध्ये फ्लॉप ठरलेल्या संजू सॅमसनवरही तिस-या टी-20 खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला. सॅमसनही त्यांच्या विश्वासावर खरा उतरला. सॅमसनने बांग्लादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 47 चेंडूत 11 चौकारांसह 8 गगनचुंबी षटकार ठोकले. ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 236.17 होता. या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर संजू सॅमसनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हार्दिक पांड्याने या मालिकेत एकदाही 50 धावांचा टप्पा गाठला नसला तरी त्याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर त्याला मालिकावीराचा पुरस्कार पटकावण्यात यश आले. त्याने बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टी20 मध्ये 16 चेंडूत 39 धावा, दुसऱ्या टी20 मध्ये 19 चेंडूत 32 धावा आणि तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 18 चेंडूत 47 धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संजू सॅमसन (150) नंतर दुसऱ्या स्थानावर राहिला. हार्दिकने या मालिकेत 59 च्या सरासरीने 118 धावा केल्या. तर पहिल्या टी20 मध्ये 4 षटकात 26 धावा देऊन एक विकेटही घेतली होती.
हेही वाचा-
ind vs ban; दिवाळीपूर्वी टीम इंडियाची आतषबाजी! ऐतिहासिक विजयासह टी20 मालिका खिश्यात
IND vs BAN; दसऱ्यादिवशीच संजू सॅमसन चमकला, ठोकले झंझावाती शतक!
वनडेमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू