भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली.
बीसीसीआयनं पहिल्या सामन्यासाठी जो संघ निवडला, त्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संघातील काही खेळाडूंच्या निवडी अत्यंत आश्चर्यकारक आहेत. टीम इंडियात श्रेयस अय्यरला स्थान मिळालेलं नाही. याशिवाय ऋतुराज गायकवाडकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आलंय. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांची भारतीय संघातील निवड समजण्या पलीकडची आहे.
(3) कुलदीप यादव – पहिल्या कसोटीसाठी भारतानं एकूण चार फिरकीपटूंची निवड केली. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि कुलदीप यादव हे 4 फिरकीपटू भारतीय संघात आहेत. मात्र प्लेईंग इलेव्हनमध्ये या चारही फिरकीपटूंचा समावेश होणं जवळपास अशक्य आहे. अशा स्थितीत कुलदीप यादवची निवड झाली नसती, तर फारसा फरक पडला नसता. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणंही कठीण आहे.
(2) केएल राहुल – केएल राहुलची अलीकडची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या डावात त्यानं अर्धशतक केलं असलं तरीही तो संघर्ष करताना दिसला. याशिवाय संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ केएल राहुलचा समावेश शुद्ध फलंदाज म्हणून करण्यात आला. जर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडायचा असता, तर केएल राहुलची निवड योग्य ठरली असती.
(1) यश दयाल – अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारसारख्या गोलंदाजांकडे दुर्लक्ष करून यश दयालचा संघात समावेश करण्यात आलाय. यश दयालची निवड समजण्या पलीकडची आहे, कारण तो दुलीप ट्रॉफीमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. दुसरीकडे मुकेश कुमारनं चांगली कामगिरी करून देखील त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. अशा स्थितीत यश दयालच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा –
IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये स्थान गमावलेले 3 दुर्दैवी खेळाडू
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं
IND VS BAN; श्रेयस अय्यरची सुट्टी; पंत-कोहलीचे पुनरागमन, पाहा संघाबाबत मोठे वैशिष्ट्ये